पंतप्रधानांचा केरळच्या पूर क्षेत्रात हवाई दौरा- ५०० कोटींची मदतीची घोषणा
नवीदिल्ली:- सलग पडणाऱ्या मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये राक्षसी थैमान घातलं आहे. त्यामुळे प्रचंड जीवित व आर्थिक हानी झाली आहे. त्याची पाहणी करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल सकाळी केरळची हवाई पाहणी केली व ५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्र्यांनी १२ ऑगस्ट रोजी १०० करोडची आर्थिक मदतही जाहीर केली होती. महापूरात मृत झालेल्या परिवाराला दोन-दोन लाख रुपये आणि गंभीर दुखापतग्रस्तांना ५०-५० हजार रुपये पंतप्रधान सहाय्य निधीतून मदत करण्यात येणार आहे.