रेश्मा मोहिते यांना शासनाच्या सहकार विभागाची प्राधिकृत अधिकारी म्हणून मान्यता!
मुंबई:- जोगेश्वरी पश्चिम पाटलीपुत्र नगर येथील ओम साईधाम देवालय समितीच्या सेक्रेटरी श्रीमती रेश्मा मोहिते यांची शासनाच्या सहकार विभागाने प्राधिकृत अधिकारी अर्थात प्रशासक म्हणून मान्यता दिली असून त्यांचे याबाबत सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
सहकार संस्थांमध्ये संपूर्ण व्यवस्थापकीय सेवेचे कार्य करीत असताना सहकार क्षेत्राचा शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रम पूर्ण करीत श्रीमती रेश्मा मोहिते यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. कलम ७७ अ/७८/७८ अ अन्वये सहकारी गृहनिर्माण संस्थांवर नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकारी अर्थात प्रशासक यांची प्रारूप नामतालिका सहकार विभागाने तयार केली असून त्यामध्ये श्रीमती रेश्मा मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीमती रेश्मा मोहिते यांनी आपला खडतर असा प्रवास करीत अनेक शैक्षणिक पदव्या प्राप्त केल्या आहेत. एवढेच नाहीतर मुंबई विद्यापीठाच्या योगशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवीच्या प्रथम सत्राच्या परीक्षेत प्रथम वर्गात यश प्राप्त केले आहे. सहकार क्षेत्र आणि योगशास्त्र हा त्यांचा आवडीचा विषय असून त्यांनी त्या क्षेत्रात मिळविलेले यश लक्षणीय आहे.
श्रीमती रेश्मा मोहिते यांना मिळालेल्या यशाबद्दल पाक्षिक `स्टार वृत्त’चे सहसंपादक मोहन सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या! मोहिते यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.