केंद्रीय मंत्री अरुण जेटलींनी स्वीकारला अर्थमंत्रालयाचा कारभार
नवीदिल्ली:- केंद्रीय मंत्री अरुण जेटलींनी अर्थमंत्रालयाचा कारभार गुरुवारी स्वीकारला. १४ मे रोजी अरुण जेटली यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे त्यांनी आपल्या अर्थखात्याचा कार्यभार पीयूष गोयल यांच्याकडे सोपविला होता. अर्थमंत्रालयाचा कार्यभार स्वीकारताच अरुण जेटली यांनी वित्त सचिव हंसमुख अधिया यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली.