कोकणासाठी १ कोटी ४१ लाख १३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

मुंबई:- कोकण महसूल विभागातील सातही जिल्ह्यांसाठी १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत १ कोटी ४१ लाख १३ हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात ठाणे जिल्ह्यासाठी ३४ लाख ५४ हजार रोपांचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षी १० लाख १ हजार वृक्षारोपणाचे लक्ष्य गाठून अतिरिक्त तीन लाख झाडे लावण्यात आली होती एकूण १३ लाख ९७ हजार ४८० वृक्ष लागवड झाली होती.

यंदा सुमारे २३ लाख ५० हजार झाडे वनविभागाकडून लावली जाणार आहे. तर ४ लाख ६९ हजार वृक्षांचे रोपण ग्रामपंचायतींकडून केले जाणार आहे. तर उर्वरीत वृक्षांचे रोपण जिल्ह्यातील महापालिकांच्या वतीने होणार आहे. वनविभागाच्या ३४९ ठिकाणी हे वृक्षारोपण होणार असून अन्य खासगी ठिकाणी वृक्षारोपण केले जाणार आहे.(‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *