पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ; दर वाढतच राहणार!
नवी दिल्ली:- आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढूनही पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली नव्हती; अखेर आज कर्नाटक विधानसभा निवडणूक होताच काही दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली. पेट्रोलच्या दरामध्ये प्रति लिटर १७ पैसे, तर डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर २१ पैसे वाढ वाढ करण्यात आली.
मुंबईत पेट्रोलचे दर ८२ रुपये ६५ पैसे प्रतिलिटर, तर डिझेल ७० रुपये ४३ पैसे प्रतिलिटर झाले आहेत. काल मुंबईत पेट्रोल ८२.४८ रुपये प्रतिलिटर होते; तर डिझेल ७० रुपये २० पैसे प्रतिलिटर होते.
आंतरराष्ट्रीय घटनांचा मागोवा घेता पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ होतच राहणार असे तज्ञांचे मत आहे.