महाराष्ट्राला ५१ पोलीस पदके – ८ शौर्य, ३ राष्ट्रपती पोलीस आणि ४० पोलीस पदकांचा समावेश
नवी दिल्ली:- स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज पोलीस पदके जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील ५१ पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. यामध्ये ८ शौर्य पदके, ३ राष्ट्रपती पोलीस पदके आणि ४० पोलीस पदकांचा समावेश आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला देशातील एकूण ९४२ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी विविध पदके जाहीर केली. देशभरातून शौर्यासाठी २ राष्ट्रपती पोलीस पदके, १७७ पोलीस पदके, उत्कृष्ट सेवेसाठी ८८ राष्ट्रपती पोलीस पदके आणि ६७५ पोलीस पदके जाहीर झाली आहेत. यात महाराष्ट्रातील ५१ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना ही पदके जाहीर झाली आहेत. तसेच राज्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दोन अधिकाऱ्यांनाही पोलीस पदके जाहीर झाले आहेत. मुंबई येथील राखीव पोलीस दलाचे निरीक्षक राधेश्याम पांडे आणि नागपूरचे उपनिरीक्षक सुरेश कुमार थापा यांनाही पोलीस पदके जाहीर झाली आहेत.
राज्यातील ३ पोलीस अधिकारी –कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके
१) श्री.शिवाजी तुळशीराम बोडखे, सहायक पोलीस आयुक्त, नागपूर शहर, नागपूर.
२) श्री.दयानंद हरिश्चंद्र ढोमे, पोलीस निरीक्षक, चतुश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर, पुणे.
३) श्री.बाळु प्रभाकर भवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक नियंत्रण कक्ष, नाशिक शहर.
८ पोलीस अधिकारी –कर्मचाऱ्यांना शौर्य पदके जाहीर
१) श्री.शितलकुमार अनिल कुमार डोईजड, पोलीस उपनिरीक्षक.
२) श्री. हर्षद बबन काळे, पोलीस उपनिरीक्षक.
३) श्री.प्रभाकर रंगाजी मडावी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल.
४) श्री.महेश दत्तु जाकेवार, पोलीस कॉन्स्टेबल.
५) श्री.अजितकुमार भगवान पाटील, पोलीस उपनिरीक्षक.
६) श्री.टिकाराम संपतराय काटेंगे, नायब पोलीस कॉन्सटेबल.
७) श्री.राजेंद्र श्रीराम तडमी, पोलीस कॉन्स्टेबल.
८) श्री.सोमनाथ श्रीमंत पवार, पोलीस कॉन्स्टेबल.
उत्कृष्ट सेवेसाठी राज्यातील ४० पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस पदके
१) श्री.नविनचंद्र दत्ता रेड्डी,पोलीस उपायुक्त, झोन १०, अंधेरी, मुंबई.
२) श्री.डॉ.पंजाबराव वसंतराव उगले, पोलीस अधीक्षक,दहशतवादी विरोधक दस्त,नाशिक
३) श्री.श्रीकांत व्यंकटेश पाठक, कमांडर, राज्य राखीव पोलीस बल गट-३,दौंड
४) श्री.सारंग दादाराम आवाड, पोलीस उपायुक्त, पुणे महानगर विकास प्राधिकरण, पुणे.
५) श्री.रविंद्र महादेव महापडी, सहायक कमांडर, राज्य राखीव पोलीस बल गट-११, नवी मुंबई
६) श्री.शिरीष सुधाकर सावंत, सहायक पोलीस आयुक्त, गावदेवी विभाग, मुंबई शहर, मुंबई
७) श्री.सुदर्शन लक्ष्मणराव मुंढे, पोलीस उपअधिक्षक, उपविभाग कर्जत, अहमदनगर.
८) श्री.धुला ज्ञानेश्वर तेले, पोलीस उपअधिक्षक, इओडब्ल्यू, नांदेड.
९) श्री.विठ्ठल नामदेव मोहिते, पोलीस निरीक्षक, एमटी, स्टेशन नवी मुंबई.
१०) श्री.सतीष गणपत मयेकर, पोलीस निरीक्षक, एटीएस,मुंबई.
११) श्री.गौतम कृष्णा गायकवाड,आर्म्ड पोलीस निरीक्षक,राज्य राखीव पोलीस बल गट-5 नागपूर.
१२) श्री.प्रिनम नामदेव परब, पोलीस निरीक्षक,पंतनगर पोलीस स्टेशन,मुंबई शहर,मुंबई.
१३) श्री.योगेंद्र चंद्राकांत पाचे, पोलीस निरीक्षक,एलटी मार्ग पोलीस स्टेशन,मुंबई शहर,मुंबई.
१४) श्री.अजय खाशाबा जाधव, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा,मुंबई शहर,मुंबई.
१५) श्री.गणपत दिनकर पिंगळे,पोलीस निरीक्षक,चितळसर पोलीस स्टेशन,ठाणे शहर,मुंबई
१६) श्री.राजेंद्रसिंग प्रभुसिंग गौर,पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा,जालना.महाराष्ट्र
१७)श्री.अनंत महिपतराव कुलकर्णी,पोलीस निरीक्षक,जिल्हा स्पेशल गुन्हे शाखा,उस्मानाबाद.
१८) श्री.विठ्ठल खंडूजी कुबडे,पोलीस निरीक्षक,छिंदवाड पोलीस स्टेशन,पुणे शहर,पुणे.
१९) श्री.दिगंबर केशव झाकडे,पोलीस उपनिरीक्षक,कोथरूड पोलीस स्टेशन पुणे शहर,पुणे.
२०)श्री.किशोर मुकुंद अत्रे,पोलीस उपनिरीक्षक,बिनतारी संदेश कक्ष,पुणे.
२१) श्री.दत्तात्रय बाबुराव मासाळ,सहायक पोलीस उपनिरीक्षक,पोलीस मुख्यालय,कोल्हापूर.
२२)श्री.रविंद्र बळीराम सपकाळे,सहायक पोलीस उपनिरीक्षक,पोलीस मुख्यालय,जळगांव.
२३) श्री.अरूण संपत अहिरे,सहायक पोलीस उपनिरीक्षक,अंबड पोलीस स्टेशन नाशिक शहर नाशिक.
२४) श्री.कृष्णाजी यशवंत सावंत,सहायक पोलीस उपनिरीक्षक,गुन्हे शाखा,मुंबई.
२५) श्री.अरीफखान दाऊदखान पठाण,ड्रायव्हर,सहायक पोलीस उपनिरीक्षक,डीसीपी झोन दुसरे कार्यालय नाशिक शहर.नाशिक.
२६)श्री.शेख जलील उस्मान,सहायक पोलीस उपनिरीक्षक,पीसीआर,अहमदनगर.
२७) श्री.सुभाष नाना जाधव,सहायक पोलीस उपनिरीक्षक,नाशिक रोड पोलीस स्टेशन,नाशिक शहर
२८) श्री.चंद्रकांत सुर्यभान इंगळे,हेड कॉन्स्टेबल,गुन्हे शाखा पुणे शहर,पुणे.
२९) श्री.सय्यद अफसर सय्यद जहुर,पोलीस हेड कॉन्सटेबल,स्थानिक गुन्हे शाखा,परभणी.
३०) श्री.सिद्धराय शिवाप्पा सत्तीगिरी,पोलीस हेड कॉन्सटेबल,डोंगरी पोलीस स्टेशन,मुंबई शहर,मुंबई.
३१) श्री.नेताजी दत्तात्रय देसाई,पोलीस हेड कॉन्स्टेबल,लाच लुचपत प्रतिबंध शाखा,वरळी मुंबई.
३२)श्री.प्रभू कोंडीबा बेलकर,पोलीस हेड कॉन्स्टेबल,गुन्हे शाखा,मुंबई शहर,मुंबई.
३३)श्री.संतोष संभाजीराव दरेकर,पोलीस हेड कॉन्सटेबल,गुन्हे शाखा,मुंबई शहर,मुंबई.
३४) श्री.रमाकांत देवराव बाविस्कर,पोलीस हेड कॉन्सटेबल,पीसीआर,नागपूर.
३५) श्री.वसंत शंकर पन्हाळकर,पोलीस हेड कॉन्सटेबल,स्थानिक गुन्हे शाखा,कोल्हापूर.
३६)श्री.नानाकुमार सुरेशप्रसाद मिसार,शोध अधिकारी ,राज्य गुप्तचर विभाग,नाशिक.
३७) श्री.अविनाश राजाराम लिंगावळे,पोलीस हेड कॉन्सटेबल,गुन्हे शाखा विभाग,मुंबई शहर,मुंबई.
३८) श्री.पांडुरंग अनंत शिंदे,पोलीस हे्ड कॉन्सटेबल,डीबी मार्ग पोलिस स्टेशन,मुंबई.
३९) श्री.चिमाजी धोंडिबा बाबर,पोलिस हेड कॉन्सटेबल,पोलिस प्रशिक्षण केंद्र,लातूर.
४०) श्री.रमेश शामराव सुर्वे,पोलीस हेड कॉन्स्टेबल, धारावी पोलीस स्टेशन मुंबई शहर,मुंबई.