‘हुनर हाट’ हे देशाचे चित्र – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारत सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे आयोजित

‘हुनर हाट’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई:- ‘हुनर हाट’ च्या निमित्ताने भारताचे छोटे स्वरुपच पाहायला मिळाले, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी काढले. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीएच्या मैदानावर भारत सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयतर्फे आयोजित ‘हुनर हाट’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, आमदार आशिष शेलार, अल्पसंख्याक आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष हाजी हैदर आझम, वसीम खान,ख्वाजा गरीब नवाज अजमेर दर्गा कमिटीचे सदस्य फारुख आझम, राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त निगम, नवी दिल्लीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शाहबाज अली आदी उपस्थित होते.

२१ ते ३१ डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार असून, देशभरातील विविध ठिकाणचे कारागीर, दस्तकार, शिल्पकार यामध्ये सहभागी झाले आहेत.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, भारत सरकारच्या या उपक्रमामुळे अशा घटकांना मार्केट आणि संधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या योजना अशा घटकांसाठी महत्त्वपूर्ण आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शनाची पाहणी केली.

केंद्रीय मंत्री मुख्तार आब्बास नक्वी म्हणाले, अल्पसंख्याक मंत्रालयाद्वारा आयोजित ‘हुनर हाट’ दस्तकार, शिल्पकारांसाठी ‘एम्पॉवरमेन्ट- एम्प्लॉयमेंट एक्सचेंज’ म्हणून सिद्ध होत आहे. दस्तकार शिल्पकारांना बाजारपेठ देण्यासाठी देशाच्या विविध भागात आयोजित ‘हुनर हाट’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’, ‘स्टँड अप इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’ या संकल्पना साकार करणारा प्रामाणिक आणि विश्वसनीय ब्रँड बनला आहे.

प्रदर्शनाबाबत : २१ ते ३१ डिसेंबर पर्यंत सदर ‘हुनर हाट’ एमएमआरडीए मैदान, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे असणार आहे. प्रदर्शनात देशाच्या विविध भागातील दस्तकार, शिल्पकार,खानसामे सहभागी. ज्यात महिलांचा सहभाग लक्षणीय. आसामचे बांबू, वेत, झारखंडच्या सिल्कच्या व्हेरायटी, भागलपुरी सिल्क आणि लिनन, लाख आणि पारंपरिक दागिने, पश्चिम बंगालचा काथा, वाराणसी सिल्क, लखनवी चिकन करी, उत्तर प्रदेशचे सिरॅमिक, टेराकोट्टा, काचेच्या वस्तू, पितळी भांडी, चामडे, संगमरवरी वस्तू, आंध्र प्रदेशातील कलमकारी, मंगलगिरी आणि मोत्यांचे दागिने, गुजरातचे अजरख, तांब्याच्या घंट्या, पतियाळाची फुलकारी आणि जुत्ती, मध्य प्रदेशचा बाटिक, बाघ, चंदेरी, महेश्वरी, जम्मू काश्मीरमधील होम फर्निशिंग, तांब्याची भांडी आणि हँडलूम,राजस्थानी स्वदेशी हँडिक्राफ्ट आणि हँडलूम उत्पादने आदी वस्तूंचा ‘हुनर हाट’ मध्ये समावेश आहे. याशिवाय अवधी खाना, राजस्थानी दाल बाटी चुरमा, गुजराती थाळी, महाराष्ट्रीयन व्यंजन,केरळी मलबार फूड, तामिळ व्यंजन, बंगाली मिठाई, सुग्नधी पान, ओडिसी सिल्व्हर फिलीग्री उत्पादन, जम्मू काश्मीरची प्रसिद्ध विलो बैट यांचा समावेश यात आहे. प्रदर्शन कालावधीत कव्वाली,सुफी संगीत, नृत्य यासह अन्य सांस्कृतिक कार्यक्रम ‘हुनर हाट’चे आकर्षक असल्याचे संयोजकानी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *