आजचा जप

ॐ गं गणपतये नम:

{वेदाचार्य मोरेश्‍वर घैसास गुरुजी}

‘गण’ शब्दाचे सुरुवातीचे अक्षर (म्हणजे ग) प्रथम उच्चारून वर्णांच्या आधी जो असतो तो (म्हणजे अ) त्यानंतर उच्चारला जातो मग अनुस्वार येतो…

गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णार्दि तद्नंतरम्‌ । अनुस्वार: परतर:।

अर्धेन्दुलसितम्‌ । तारेण ऋद्धम्‌। एतत्तव मनुस्वरूपम्‌।

गकार: पूर्वरूपम्‌। अकारो मधमरूपम्‌।

अनुस्वारश्चान्त्यरूपम्‌। बिन्दुरुत्तरूपम्‌।

नाद: संधानम्‌। संहिता संधि:। सैषा गणेशविद्या।

गणक ऋषि:। निचृदगायत्री छंद:। गणपतिर्देवता।

ॐ गं गणपतये नम: ।।७॥

अर्थ : ‘गण’ शब्दाचे सुरुवातीचे अक्षर (म्हणजे ग) प्रथम उच्चारून वर्णांच्या आधी जो असतो तो (म्हणजे अ) त्यानंतर उच्चारला जातो. मग अनुस्वार येतो. (तो कसा?) चंद्राच्या कोरीच्या (चिन्हाचा जो उच्चार असतो तसा). (हे सर्व) ॐ काराने युक्त असते. हे गणेशा! हे तुझे मंत्रात्मक स्वरूप आहे! (हेच अधिक सोपे करून सांगायचे, तर असे म्हणता येईल, की) गकार हा प्रथम, मधे अकार आणि शेवटी अनुस्वार. वरच्या बाजूस बिंदू हे त्याचे रूप. या सर्वांना जोडण्याचे साधन नाद आहे. यांची जोडणी संहिता स्वरूपाची आहे. ही ती गणेश विद्या. (तिचा) ऋषी गणक. (या मंत्राचा छंद) निचृद गायत्री. या मंत्राची देवता गणपती ँ हा तो मंत्र.

निरूपण : गणेशाचे तत्त्वात्मक स्वरूप या पूर्वीच्या मंत्रात सांगितल्यावर या मंत्रात त्याचे मंत्र स्वरूप सांगितले जात आहे. (मनु म्हणजे मंत्र). मंत्र हा उच्चारासाठी (किंवा ध्यानासाठी) असतो. आता उच्चार लिखित रूपात सांगायचा हे अवघड काम आहे. उच्चार नि:संदिग्धपणे कळावा; म्हणून उदाहरणाचा आधार घेतला आहे. ‘गण’ या शब्दातील पहिला वर्ण ग तो उच्चारावा. मग सर्व वर्णाच्या सुरुवातीचा उच्चारावा म्हणजे झाला ग याच्यापुढे अनुस्वार. हा स्वतंत्र वर्ण आहे. त्याचा शुद्ध उच्चार वर्णमालेत नाही; पण भाषेत आहे. वेदांच्या पोथ्यांमध्ये अनुस्वार ँ किंवा ँ दाखविला जातो आणि तो स्वतंत्र उच्चार असल्याने ‘परतर’ वर्णाच्या पुढे असतो म्हणजे ग ँ हा अर्ध चंद्र त्या पुढे दिसणाऱ्या चांदणीसह, म्हणून अर्ध्या चंद्रासारखा शोभून दिसणारा. (लसित). ँ तार म्हणजे प्रणव किंवा ॐ काराने समृद्ध असतो म्हणजे ॐ ग ँ हा झाला मंत्र. गणेशाचे मन्त्ररूप हे त्याच्या तत्त्वरूपाच्या प्राप्तीचे साधन असल्याने हाच गणेश मंत्राचा मुद्दा आणखी सोपा करून सांगितला आहे. यात ग्‌ अ अनुस्वार असे तीन घटक आहेत. वेदाच्या पोथ्यांमध्ये अनुस्वार हा उच्चार वेगवेगळ्या पद्धतीने लिहिला जातो. त्यापैकी वरच्या (उत्तर) टिंब देऊन तो लिहावा असे अभिप्रेत आहे म्हणजे ‘गं’ म्हणजे पहिल्या भागात मंत्राचे लिखित रूप ॐ गं असे सांगितले आहे आणि तोच मुद्दा सोपा करून सांगताना हे ॐ गं असे सांगितले आहे. इथे ॐ गृहीत धरला आहे.

हे सगळे तीन खंड तुकड्याने न ठेवता ते नादाने म्हणजे प्रत्यक्ष ध्वनिरूप उच्चाराने जोडावेत. संधान म्हणजे जोडणीचे साधन. मात्र, ही जोडणी (संधी) अत्यंत सलग असावी. मध्येही जराही कालान्तर न ठेवता जे सलग उच्चारण करतात, त्या पद्धतीचे नाव संहिता म्हणजे गं किंवा ग ँ असे सलग, एका दमात म्हणावे.

विद्या हा उपनिषदांचा आवडता विषय आहे. तिथे उपासनेसाठी विविध विद्या सांगितल्या आहेत. त्यातील कित्येक विद्या ध्यानरूप उपासना सांगतात. या ठिकाणी मंत्ररूप उपासना सांगितली आहे. ॐ गं (किंवा ॐ ँ) हा मंत्र गणेशाची प्राप्ती करून देणारा आहे. मंत्राला ऋषी, छंद आणि देवता असते, ही त्या त्या मंत्राची ओळख असते. या मंत्राचे ज्याला स्फुरण झाले तो गणक नावाचा ऋषी. याचा छंद निचृद्‌ गायत्री. गायत्री छंदात एका चरणात ८ अक्षरे असून, तीन चरणांत मिळून २४ असतात. त्यापेक्षा कमी असतील, तर त्यास निचृद्गायत्री म्हणतात. हा एकाक्षरी मंत्र आहे; म्हणून त्याला निचृद्गायत्री म्हटले आहे. मंत्रात देवतेमुळे कार्यशक्ती येते. मंत्राची देवता गणपती.


[Bubble-Menu id=”1″]