राजधानीत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी
नवी दिल्ली:- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त (अ.का.) समीर सहाय यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, इशु संधु, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय केंद्रात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले. कार्यालयात उपस्थित अधिकारी- कर्मचा-यांनी यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.