२६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन

मुंबई:- मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मरीन लाईन्स पोलीस जिमखाना येथील शहीद स्मृतिस्थळाला राज्यपाल चे.विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, पदुममंत्री महादेव जानकर, गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ.रणजित पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, सर्वश्री आमदार अॅड.आशिष शेलार, राज पुरोहित, भाई जगताप, अमीन पटेल, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध कुमार जैस्वाल, अमेरिकेचे राजदूत केनिथ जस्टर, एनएसजी कमांडो हेमंत साहनी, शहीद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य यांनीही पुष्प अर्पण करून शहिदांना अभिवादन केले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पेंटिंग इन्स्टॉलेशनचे अनावरण

कोकुयो कॅम्लिन लिमिटेडतर्फे २६/११ चा थरार चित्ररूपात मांडला आहे. या पेंटिंग इन्स्टॉलेशनचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी पेंटिंगची पाहणी करुन कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *