पाकिस्तानातून १९०८ मेट्रिक टन साखरेची आयात-शासनाचा खुलासा!

नवी दिल्ली:- पाकिस्तानातून साखर आयातीबाबत प्रसार माध्यमातून देण्यात आलेली माहिती चुकीची असून चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानातून केवळ १९०८ मेट्रिक टन साखरेची आयात करण्यात आल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून आज सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानातून केल्या जाणाऱ्या साखर आयातीबाबत काही प्रसारमाध्यमांमध्ये चुकीची माहिती प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून काल यासंदर्भात खुलासा करण्यात आला.

पाकिस्तानातून १९०८ मेट्रिक टन साखर आयात

चालू आर्थिक वर्षात १४ मे २०१८ पर्यंत पाकिस्तानातून केवळ १९०८ मेट्रिक टन साखरेची आयात करण्यात आली असून त्याची किंमत ०.६५७ दशलक्ष अमेरिकन डॉलरअसल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. तुलनेने २०१७-१८ यावर्षात पाकिस्तानातून १३ हजार ११० मेट्रिक टन साखर आयात करण्यात आली होती व त्याची किंमत ४.६८ दशलक्षअमेरिकन डॉलर होती.

भारतात प्रामुख्याने ब्राझील कडून साखरेची आयात केली जाते. २०१७-१८ च्या गळीत हंगामात देशात साखरेचे उत्पादन ३१.९० मेट्रिक टन झाले. या वर्षभरातच देशातून १.७५ दशलक्ष टन साखरेची निर्यातही झाली. एप्रिल-मे २०१८ या दोनच महिन्यात साखरेची एकूण निर्यात 240.०९३ मे.ट. इतकी होती. म्हणजेच भारतातील साखरेचे एकूण उत्पादन व निर्यात यांच्या तुलनेत पाकिस्तानातून होणारी आयात अत्यल्प असल्याचे स्पष्ट होते. पाकिस्तान सरकारने त्यांच्या निर्यात साखरेवर प्रती किलो १०.७ रूपयांचे अंशदान (सबसिडी) दिल्याचेही वाणिज्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

भारतात साखरेची आयात पूर्णपणे मोफत

सध्या भारतात साखरेवर १०० टक्के सीमा शुल्क असून साखरेची आयात मोफत होते. भारतात आयात होणाऱ्या कोणत्याही मालावर पाकिस्तानबाबत विशिष्ट निर्बंध घालण्यात आले नसल्याचे वाणिज्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. जागतिक व्यापार संघटनेचा “एमएफएन` करार भारतासह या संघटनेच्या सभासद असलेल्या पाकिस्तान व अन्य देशांवर बंधनकारक आहे. (यानुसार सर्व देशांनी आपले आयात-निर्यात धोरण एकसारखेच लागू करणे व भेदभाव न करणे अपेक्षित आहे.)

देशातील साखर आयातीवर दृष्टीक्षेप

साखरेच्या किंमतीच्या दृष्टीने विचार केल्यास आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये भारताने १०१९ दशलक्ष अमेरिकन डॉलर किमंतीची साखर आयात केली होती. २०१७-१८ मध्ये साखरआयातीत ९३४ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी घट झाली. यंदा एप्रिल-मे २०१८ या काळात साखरेची एकूणआयात ३७.७५ दशलक्ष डॉलर इतकी झाली आहे.

देशात २०१६-१७ मध्ये २.१४ दशलक्ष मे.टन साखरेची आयात झाली. वर्ष २०१७-१८ मध्ये त्यात किंचित वाढ होऊन साखर आयातीचे प्रमाण २.४० दशलक्ष मे. टन इतके झाले.एप्रिल-मे २०१८ दरम्यान एकूण साखर निर्यात ११६,२५१२ मे.टन होती.

ब्राझीलकडून आपल्या देशात बहुतांश साखर आयात केली जाते. प्रागतिक अधिकृत किंवा प्रमाणित पद्धतीनुसार साखरेची आयात देशांतर्गत विक्रीसाठी केली जात नाही तरकेवळ निर्यातीसाठीच ही साखर आयात केली जाते. सीमाशुल्क अदा करण्यासाठी आयातदारांना एमईआयएस (भारतातून होणारी व्यापारी निर्यात) पद्धतीचा वापर करणे बंधनकारक आहे. यात सरकारकडून त्यांना निर्यातीच्या किंवा निर्यात रकमेच्या प्रमाणात काही पिशव्या दिल्या जातात. या पिशव्या व्यापारमुक्त असल्याने आयातदार त्या अन्य निर्यातदारांकडूनही खरेदी करू शकतात.

पाकिस्तानातून आयात साखरेच्या दर्जावर नजर

पाकिस्तानातून मुंबई व वाघा येथे आयात होणाऱ्या साखरेच्या दर्जाची बारकाईने तपासणी करणे आणि एफएसएसएआयच्या प्रयोग शाळांमध्ये या साखरेची काटेकोर तपासणी करण्याबाबत वाणिज्य मंत्रालयाने सीमाशुल्क विभागास विनंती केली आहे.

देशातून झालेल्या साखर निर्यातीबाबत संक्षेपात- २०१६-१७ मध्ये भारताने २.५४ दशलक्ष मे.टन साखरेची निर्यात केली. २०१७-१८ मध्ये त्यात १.७५ दशलक्ष मे.टन इतकी घट झाली. २०१८-१९ या आर्थिक वर्षातील एप्रिल-मे या दोन महिन्यांत साखरेची एकूण निर्यात २४०,०९३ मे.टन होती. (‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *