पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक १४ डिसेंबर २०२१
मंगळवार दिनांक १४ डिसेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- मार्गशीर्ष शुक्लपक्ष एकादशी रात्री २३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- आश्विनी १५ डिसेंबररच्या पहाटे ४ वाजून ३९ मिनिटांपर्यंत
योग- परीघ १५ डिसेंबररच्या सकाळी ६ वाजून २८ मिनिटांपर्यंत
करण १- वणिज सकाळी १० वाजून ३० मिनिटांपर्यंत
करण २- विष्टि रात्री २३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत
चंद्रराशी- मेष अहोरात्र
सूर्योदय- सकाळी ०७ वाजून ०५ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून १ मिनिटांनी
चंद्रोदय- दुपारी १४ वाजून ४८ मिनिटांनी
चंद्रास्त- उत्तररात्री ०२ वाजून ५४ मिनिटांनी
भरती- सकाळी ०८ वाजून २८ मिनिटांनी आणि रात्री २१ वाजून ५२ मिनिटांनी
ओहोटी- उत्तररात्री ०२ वाजून ३८ मिनिटांनी आणि दुपारी १५ वाजून १० मिनिटांनी
राहुकाळ- दुपारी १५ वाजून १८ मिनिटांपासून ते दुपारी ०४ वाजून ४१ मिनिटांपर्यंत
दिनविशेष:- आज आहे राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन
भारतात राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस माणसाच्या दैनंदिन जीवनातील ऊर्जेचे महत्त्व जाणून ऊर्जा बचत करण्यासाठी साजरा केला जातो.
उर्जेचे अनावश्यक वापर टाळून ऊर्जा संवर्धन करण्याची गरज आहे. भविष्यातील वापरासाठी ती जतन करणे तसेच उपलब्ध उर्जा कार्यक्षमतेने वापरणे अतिशय आवश्यक आहे. ऊर्जा संवर्धन योजनेत अधिक परिणाम मिळवण्यासाठी प्रत्येक संसाधनाच्या वापरात ऊर्जा संवर्धनाची नाळ रुजलेली असावी.
अनावश्यकपणे चालणारे पंखे, लाइट, हीटर, रोजच्या वापरातील कार टेप किंवा इतर इलेक्ट्रीक वस्तूंना जोडतांना ही काळजी घेवून ऊर्जा वाचवू शकतो. ऊर्जेचा अतिरिक्त वापर वाचवण्याकरता ही अधिक सोपी व कार्यक्षम पद्धत आहे. ज्यामुळे आपण राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन मोहिमेत मोठी भूमिका बजावू शकतो.
भारतात ऊर्जा संवर्धन कायदा २००१ मध्ये एनर्जी एफिशियन्सी ब्युरो द्वारे अंमलात आला. ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो म्हणजे एक संवैधानिक संस्था आहे जी भारत सरकारच्या अंतर्गत येते आणि ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी धोरणे आणि धोरणाच्या विकासास मदत करते.
१५०३ साली प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता नोस्ट्रे डॅमस यांचा जन्म झाला.
१९४६ साली इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी आणि
१९२४ साली अभिनेता चित्रपट निर्माता व दिग्दर्शक राज कपूर यांचा जन्म झाला.
१९७७ साली गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते ग.दि. माडगूळकर यांचे निधन झाले. गीतरामायणामुळे त्यांना ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते.