पंचांग आणि दिनविशेष- बुधवार दिनांक १५ डिसेंबर २०२१

बुधवार दिनांक १५ डिसेंबर २०२१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- मार्गशीर्ष शुक्लपक्ष द्वादशी १५ डिसेंबरच्या उत्तररात्री ०२ वाजून ०१ मिनिटांपर्यंत
नक्षत्र- भरणी अहोरात्र
योग- शिव अहोरात्र

करण १- बव दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत
करण २- बालव १५ डिसेंबरच्या उत्तररात्री ०२ वाजून ०१ मिनिटांपर्यंत

चंद्रराशी- मेष अहोरात्र

सूर्योदय- सकाळी ०७ वाजून ०६ मिनिटांनी
सूर्यास्त- सायंकाळी १८ वाजून २ मिनिटांनी

चंद्रोदय- दुपारी १५ वाजून २३ मिनिटांनी
चंद्रास्त- पहाटे ०३ वाजून ४४ मिनिटांनी

भरती- सकाळी ०९ वाजून १७ मिनिटांनी आणि रात्री २२ वाजून ३३ मिनिटांनी
ओहोटी- पहाटे ०३ वाजून ३८ मिनिटांनी आणि दुपारी १५ वाजून ४८ मिनिटांनी

राहुकाळ- दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांपासून ते दुपारी ०१ वाजून ५६ मिनिटांपर्यंत

दिनविशेष-
रत्नागिरी पावस येथील स्वामी स्वरुपानंद यांची आज जयंती!

भारतीय लेखक, पटकथा लेखक, संगीतकार, निर्माते आणि दिग्दर्शक सत्यजित रे यांना १९९१ साली ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला.

१९०५ साली साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंश शास्त्रज्ञ, समाज शास्त्रज्ञ व शिक्षण तज्ञ इरावती कर्वे यांचा जन्म झाला. .

भारतात सर्वाधिक लोकप्रिय आणि कडक शिस्तीचे म्हणून ओळखले गेलेले मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांचा जन्म १९३२ साली झाला.

१९३५ साली भारतीय पार्श्वगायिका व संगीतकार उषा मंगेशकर यांचा जन्म झाला. .

स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्‍न सरदार वल्लभभाई पटेल यांची आज पुण्यतिथी!

 

 

You cannot copy content of this page