खाजगी कंत्राटी प्रवाशी वाहनांचे भाडेदर निश्चित

सिंधुदुर्गनगरी:- राज्यातील प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात खाजगी कंत्राटी वाहनांचा वापर करण्यात येतो. अशा प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून खाजगी कंत्राटी वाहतुकीची ने-आण करणाऱ्या वाहतुकदारांकाडून गर्दीच्या हंगामामध्ये अवाजवी भाडेवाढ करण्यात येते.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गृह विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवाशी वाहनांचे कमाल भाडेदर निश्चित केले आहेत. निश्चित केलेले भाडेदर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भाडेदरापेक्षा ५० टक्केहून अधिक राहणार नाही.

खाजगी कंत्राटी वाहनांचा वापर करणाऱ्या प्रवाशांनी विहित केलेल्या कमाल भाडेदरापेक्षा अथिक भाडे आकारण्यात येत असल्यास, त्यांनी कार्यालयाच्या ०२३६२ २२९०५० या दूरध्वनी क्रमांकावर तसेच dyrto.07-mh@gov.in या ईमेलवर, याशिवाय सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे (९८२२८४२३३३) यांच्या भ्रमणध्वनीवर आपली तक्रार नोंदवावी. असे आवाहन उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी केले आहे.