अनिरुद्ध पहाट…!

हरि ॐ

प्रत्येक मानवाने पहाटे उठणे हे शारीरिक आणि अध्यात्मिक दृष्ट्या उपयुक्त मानले जाते!

ह्याची प्रचिती अनेकजण घेत असतात! ही पहाट जर सद्गुरु नामस्मरणाने झाल्यास जीवनात शुभ-पवित्र स्पंदनांची कमतरता कधीच भासणार नाही!

त्यातून जे समाधान मिळेल, जो आनंद मिळेल; तो संपूर्ण दिवसभर टिकून राहील!
तसेच दुसऱ्या दिवशीही पहाट कधी होते? ह्याची ओढ मनाला, बुद्धीला, शरीराला लागेल!
म्हणून सद्गुरु कृपेने `अनिरुद्ध पहाट’चा शुभारंभ अक्षयतृतीयेच्या शुभ- पवित्र दिवशी होत आहे!

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:।
गुरु: साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः।।

माझा सद्गुरुच ब्रह्मा आहे,
माझा सद्गुरूच विष्णू आहे,
माझा सद्गुरुच महेश्वर आहे,
माझा सद्गुरुच साक्षात परब्रह्म आहे!

अशा माझ्या सद्गुरुला, सद्गुरुतत्वाला मी `श्री गुरवे नमः’ म्हणून मनोमनी श्रद्धेने नमस्कार करतो! माझे मन जे आहे त्याचा प्रवास उलट करतो म्हणजे नमः म्हणजेच माझे मन नमः करून त्या सद्गुरु चरणांशी समर्पित होण्याचा प्रत्येक क्षणाला प्रयास करतो!
ही प्रयास करण्याची बुद्धी तोच मला देतो!
प्रयास करण्याचे सामर्थ्य तोच मला देतो! कारण तो मन:सामर्थ्यदाता आहे!

-`स्टार वृत्त’ ३००४२०२५