श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस – १३
*🌟श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस -१३🌟*
*🔆 बापूंचे गुरुवारचे प्रवचन आणि ग्रंथसंपदा🔆*
*🔆सद्गुरू श्रीअनिरुद्धांची प्रवचन शृंखला :*
🔅बापूंची प्रवचनं म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून श्रध्दावानांच्या जीवनात उत्साह ,आनंद आणि पुरुषार्थ निर्माण करून देणारा मोठा खजिनाच आहे.
🔅 सद्गुरू श्रीअनिरुद्धांकडे येणाऱ्या प्रत्येक श्रद्धावानला हा अनुभव असतोच की बापुच प्रवचन हे माझ्यासाठीच होतं. आपल्या मनातल्या प्रश्नानंचच उत्तर बापू त्यांच्या प्रत्येक प्रवचनातून देत असतात ह्याचा अनुभव प्रत्येक श्रद्धावानाला येतोच.
*🔅आता आपण बापूंची 1996 पासूनची प्रवचन शृंखला पाहुयात:*
१) विष्णू सहस्त्रनामावरील एकूण २५१ नामांवरील प्रवचने.
२)साईंच्या ११ वचनांवरील प्रवचने.
३)श्री ललितासहस्त्रनामावरील हिंदी प्रवचने
४)रामरक्षेवरील प्रवचने
५) महासंकटमोचन , महापापनिवारक दिव्यप्रकाश आराधनाज्योती वरील प्रवचने
६)श्री साई सच्चारीतवरील हिंदी प्रवचने
७)सप्तचक्रांवरील पितृवचने
८)श्रीसुक्तावरील पितृवचने
९)श्री पंचमुख हनुमानकवचावरील पितृवचने
१०) त्रिविक्रम अनंतनामावली वरील पितृवचने
११ )नारदीय भक्तीसूत्रांवरील पितृवचने
१२) श्रद्धावान विश्वातील भक्तांच्या कथा
*🔅काही विशेष प्रवचने:*
१) तेरा कलमी कार्यक्रमावरचे प्रवचन
२)रामराज्य २०२५ वरील प्रवचन
३) स्वास्थ आणि आरोग्य विषयक प्रवचन
४) पंचस्वार्थ वरील प्रवचने
५)भक्तिभाव चैतन्यावरील पितृवचने
🔅बापूंचे पहिले प्रवचन समर्थ व्यायाम मंदिर ,दादर येथे झाले आणि आता बापुंचे प्रवचन श्री हरिगुरुग्राम , बांद्रा येथे न्यू इंग्लिश स्कूल मध्ये होते..
आता आपण बापूंची ग्रंथसंपदा बघुयात..
*🔆सद्गुरू श्रीअनिरुद्धांची ग्रंथसंपदा :*
*🌟📖श्रीमद्पुरुषार्थग्रंथराज📖🌟*
*🔅‘अंधकार दूर करण्याचा माझा यज्ञ म्हणजेच ‘श्रीमद्पुरुषार्थ’ अर्थात्‘सत्यस्मृती’. हा यज्ञ मी आजपर्यंत करत आलो आहे व निरंतर करत राहणारच आहे. माझ्या नावाप्रमाणे हा यज्ञही अनिरुद्धच आहे व त्यातून निर्माण होत राहणारा प्रकाशही. हा मार्ग स्वीकारा असा माझा आग्रहही नाही आणि विनंतीही नाही. कारण प्रत्येक जीवाचे विचारस्वातंत्र्य व कर्मस्वातंत्र्य मला पूर्णपणे मान्य आहे. ‘श्रीमद्पुरुषार्थ’ अर्थात्‘सत्यस्मृती’ हा माझा धर्म आहे आणि तो मी पाळणारच. माझे प्रत्येक निर्णय, कृती व कार्य ह्याच नियमाने झाले व होत राहणार’,* या शब्दांत सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजाविषयीची भूमिका ग्रन्थराजाच्या प्रत्येक खंडाच्या सुरुवातीसच स्पष्ट केली आहे.
🔅 *‘अनेक ॠषी, मुनी, आचार्य, संत, तत्त्वज्ञानी महापुरुष व सामान्य जनांच्या चिंतनपुष्पातून मी हा मध गोळा केला व ह्या ‘श्रीमद्पुरुषार्थ’अर्थात ‘सत्यस्मृती’ पोळ्यात एकजीव केला. हे पोळे मी खुले ठेवले आहे. ज्याला ह्याची चव व औषधी गुण आवडतील त्या प्रत्येकासाठी’,* असे सदगुरु अनिरुद्ध या ग्रंथराजात सांगतात.
🔅‘श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज’ सद्गुरु अनिरुद्धांच्या १३ कलमांपैकी एक कलम आहे. ‘सत्यप्रवेशः’, ‘प्रेमप्रवास’ आणि ‘आनन्दसाधना’ असे या श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजाचे तीन खंड आहेत.
🔅तीनही खंडांची रचना –
*१) सत्यप्रवेश-*.
सदगुरु श्रीअनिरुद्धांनी या मर्यादामार्गांचा परिचय या खंडात अत्यंत सोप्या शब्दात आणि सोपी उदाहरणे देऊन करून दिला आहे.
*२)प्रेमप्रवास:*
🔅मानवाचा जीवनप्रवास आनंदमय होण्यासाठी आवश्यकता असते, संपूर्ण प्रवासभर त्या एकमेव सत्याला, परमेश्वराला शोधत राहण्याची आणि ह्या सत्याचा शोध म्हणजेच परमेश्वराचा शोध अर्थात आनंदप्राप्ती, हा प्रवास प्रेममय असल्याशिवाय होत नाही.
🔅समर्थ व तृप्त जीवनप्रवासाचा एकमेव मार्ग म्हणजेच ‘प्रेमप्रवास’ आणि ‘प्रेमप्रवास’ म्हणजे ‘मर्यादापुरुषार्थ’.
*३) आनंदसाधना :*
आनन्दसाधना’ म्हणजे मर्यादामार्गावरून परमेश्वरावर प्रेम करीत वाटचाल करताना जागोजागी भरभरून राहिलेला आनन्द प्राप्त करून घेण्याचे विविध उपाय.
*🌺📖मातृवात्सल्यविन्दानम्📖🌺*
🔅सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू म्हणतात की, *“हा ग्रंथही आहे, हे गुणसंकीर्तनही आहे, ही ज्ञानगंगा आहे, ही भक्तीभागीरथीही आहे व आदिमातेचे आख्यान तर आहेच आहे. परंतु ह्या सर्वांच्या पलीकडे हे माझ्या आदिमातेचे शुभंकरा व अशुभनाशिनी स्वरुप आहे, वात्सल्य आहे व वरदानही आहे.”*
🔅आदिमातेने केलेल्या आज्ञेनुसार श्रीपरशुराम श्रीगुरुदत्तात्रेयांकडून श्रवण केलेले व स्वतः अनुभवलेले चण्डिकेचे आख्यान नित्यस्मरण करीत राहिले व त्यांनी तिच्याच आज्ञेनुसार ऋषी सुमेधस, ऋषी हरितायन व मृकंड पुत्र ऋषि मार्कण्डेय ह्या स्वतःच्या तीन सत्-शिष्यांना ह्याचा उपदेश केला. ह्या आख्यानाचे काही पाठ मार्कण्डेयपुराण, कालिकापुराण आणि सप्तशती आख्यानात आलेले आहे.
🔅 या ग्रंथामध्ये गुरु-शिष्याच्या संवादातून आदिमातेच्या गायत्री, महिषासुरमर्दिनी आणि अनसूया रुपाचे आख्यान आपल्यासमोर येते. आदिमाता चण्डिकेचे रुप, कार्य, गुण यांची माहिती या ग्रंथामधून आपल्याला होते.
*🌸📖मातृवात्सल्य उपनिषद📖🌸*
.🔅आदिमातेच्या मणिद्वीपापर्यंत होणारा प्रवास किती चित्तवेधक, रसमय, चैत्यनदायी आणि विलक्षण आहे याची अनुभूती ठायी ठायी येते.
या *आदिमातेची क्षमा, कारुण्य, प्रेम थेट आपल्यापर्यंत पोहोचविणारा अद्वितीय ग्रंथ म्हणजे मातृवात्सल्य उपनिषद*
🔅आई चण्डिकेची क्षमा, रक्षण आणि अर्थातच आधार ह्या ग्रंथामधून आपल्यापर्यंत ते पोहोचवतात. *श्रद्धावानाच्या मनातील सर्व प्रश्न, भय दूर करून भक्ती आणि सामर्थ्य दृढ करणारा हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे.*
🔅हा हितकारक बदल घडवणारा हा ग्रंथ केवळ दिशादर्शकच नाही तर चण्डिकाकुलाच्या प्रेमामुळे ह्या दिशेने प्रवास करण्याची ताकदही देतो.
🔅आई चण्डिकेकडे नेणारा मार्ग सदैव खुला असतो, द्वार उघडे असते ही जाणीव करून देणारा हा ग्रंथआपल्या आतमधली अनेक बंद द्वारे अलगद उघडतो, आपल्या आतमधील अनेक अडथळे अलगद दूर करतो आणि ह्या आईच्या कृपेच्या मोकळ्या मार्गावर आणतो. असे जेव्हा घडते, तेव्हाच आईच्या जवळ नेणार्याखुल्या द्वाराची जाणीव होते. आणि हे कार्य हा ग्रंथ, म्हणजेच सद्गुरुंचा कळकळीचा शब्द नक्कीच साध्य करतो.
*🏹📖 रामरसायन 📖🏹*
🔅सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी (बापू) लिहिलेला *‘श्रीरामरसायन’* हा ग्रंथ रामनामाचे हे रसायन कसे आहे, हे विशद करून सांगतो. शरीरातील त्रिदोषांमध्ये (वात, कफ, पित्त यांमध्ये) जो असमतोल तयार होतो, त्याचे निराकरण करून जरा-व्याधिविनाशन करणारे द्रव्य म्हणजे रसायन. शरीरातील प्रत्येक इंद्रियाला आणि अवयवाला त्याचं त्याचं काम करण्याची श्रेष्ठ क्षमता व गती देणारं औषध म्हणजे रसायन. रामरसायन म्हणजे रामाचे सदा दास बनून रहाणे. आमच्या त्रिविध देहांवर (भौतिक, मनोमय व प्राणमय) कार्य करणारे रसायन म्हणजे रामरसायन.
🔅हा ग्रंथ वाचताना या ग्रंथातील प्रत्येक पात्र आपल्या समोर सजीव होऊन उभे राहते आणि रामनामाने पाषाणही जसे सहजतेने सागरावर तरतात, तसेच रामनाम आपले जीवन तारेल याबद्दल प्रत्येक श्रद्धावानांच्या मनात विश्वास निर्माण होतो. या ग्रंथात रामायणातील विविध पात्रे आपल्याला आपल्या जीवनातीलच विविध पैलू लक्षात आणून देतात. हा ग्रंथ आपल्यामधील रावणसदृश दुर्गुणांची जाणीव करून देऊन त्यांचा नाश करण्यासाठी, तसेच आपल्या जीवनात उचित बदल घडवून आणण्यासाठी एक सहजसोपा आध्यात्मिक मार्ग दाखवितो.
🔅सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी लिहिलेला ‘रामरसायन’ हा ग्रंथ हे केवळ प्रभू रामचंद्राचे जीवनचरित्रच नाही, तर आपले जीवन चैतन्याने, जिवंतपणाने आणि सकारात्मक पद्धतीने जगण्यासाठी असणारी एक आचारसंहिताच आहे. सर्वोच्च असणार्या *‘श्रीरामांची नि:स्वार्थ सेवा’* हेच प्रत्येक मानवाच्या आयुष्यातील परमोच्च शिखर आहे आणि हाच ‘रामरसायना’चा खरा गाभा (आत्मा) आहे.
🔅परमपूज्य सद्गुरू श्रीअनिरुद्ध बापूंनी ‘रामायणा’ सारख्या महान पवित्र ग्रंथातील सार श्रद्धावानांकरिता सहज, सुंदर शुद्ध मराठी भाषेमध्ये व सचित्र अशा स्वरूपात ‘रामरसायन’ ग्रंथाच्या स्वरूपात खुले करून दिले. श्रद्धावान या ग्रंथाचे अत्यंत प्रेमपूर्वक पठण करीत असतात. श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथेही रात्रपठणासाठी येणारे भक्त ‘रामरसायन’ या ग्रंथाचे प्रेमपूर्वक पठण करतात. ‘रामरसायन’ ज्याच्याकडे आहे अशा श्री हनुमंताचे गुणवर्णन असलेल्या हनुमानचालिसेसह सुंदरकांड पठणही बापूंच्याच मार्गदर्शनानुसार श्रद्धावान भक्त करीत असतात.
*🙏📖आवाहनं न जानामी📖🙏*
डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (सदगुरु श्रीअनिरुद्ध बापू) यांनी लिहलेले हे “आवाहनं न जानामी” पुस्तक १९९७ च्या रामनवमीला प्रकाशित केले गेले होते. साध्या सोप्या सरळ भाषेत एका भक्ताच्या अंतरंगातील घालमेल, आर्तसाद यामध्ये मांडली आहे. *एका सच्च्या भक्ताचा त्याच्या सद्गुरुशी असलेला संवाद* ह्या पुस्तकात मांडण्यात आलेला आहे. जो अगदी प्रत्येकाच्या काळजाला भिडतो. आयुष्यात आपल्याला पडणारे अनेक प्रश्न बापूंनी या पुस्तकात उपस्थित केले आहेत. एका साध्या भक्ताच्या भूमिकेत येऊन बापूंनी हे पुस्तक लिहिलेले आहे.
*☝️📖तदात्मानं सृजाम्यहम्📖☝️*
डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (सदगुरु श्रीअनिरुद्ध बापू) यांनी लिहलेले हे “तदात्मानं सृजाम्यहम्” पुस्तक १९९७ च्या रामनवमीला प्रकाशित केले गेले होते. ह्या पुस्तकामध्ये खर्या अर्थाने एका सद्गुरुचे अंतरंग उलगडले आहे. खरंतर सद्गुरुच्या मनात काय चालते याचा ठाव कुणालाच लागणे शक्य नाही. पण तरीही आपल्या भक्ताबद्द्ल सद्गुरुच्या मनात जे काही दाटून येतं ते सर्वकाही या पुस्तकात बापूंनी मांडलेले आहे. *भक्ताच्या भोळ्या भाबड्या काही वेळेस तीक्ष्ण भासणार्या प्रश्नांना सद्गुररुंनी अतिशय प्रेमळपणे उत्तर* दिले आहे.
*☄️📖तिसरे महायुद्ध पुस्तक📖☄️*
🔅गेल्याच शतकात संपूर्ण जगाला हादरवून सोडणारी २ महायुद्धे झाली. या महायुद्धांचा अभ्यास केला की तिसर्या महायुद्धाची सद्यस्थिती लक्षात येईल.
ह्या दोन महायुद्धांनी जगाची सर्व समीकरणे बदलून टाकली. आज पुन्हा एकदा जग तिसर्या महायुद्धाच्या दिशेने वेगाने गती करत आहे.
🔅 *शांतीचा बुरखा पांघरून तिसर्या महायुद्धाची डाकीण दार ठोठावत आहे’,* हे वाक्य कोणत्याही चित्रपटातील वा नाटकातील डायलॉग नव्हे, तर आजच्या जगातील सद्यस्थितीचे वास्तववादी भाष्य आहे.
🔅लेखकाबद्दल थोडेसे –
या पुस्तकातील नमूद घटनांची प्रचिती – डॉ. अनिरुद्ध जोशींनी सन २००६ साली लिहिलेल्या या पुस्तकातील अनेक गोष्टींचा पडताळा गेल्या काही वर्षांपासून घडत असलेल्या आणि सध्याच्या जागतिक रंगमंचावरील घटना पाहता जागरुक वाचकाला येत आहे.
🔅आज आम्ही पहातो की अमेरीकी कॉंग्रेस सदस्य फ्रॅंक वुल्फ, इस्त्रायल संरक्षणमंत्री मोशे यालॉन, जॉर्डन किंग अब्दुल्ला बिन हुसेन यासारख्या जगातील काही नेत्यांनी, अनेक वेबसाईट्स आणि वृत्तपत्रांनी तिसरे महायुद्ध सुरु झाले असल्याचे मत मांडले आहे. स्वत: पोप फ्रान्सिस यांनी ‘सध्या जगात तिसरे महायुद्ध सुरु असल्याचे’ म्हटले आहे.
*🔅चीन, पाकिस्तान आणि उत्तर कोरिया या त्रिकुटाचा जगाला असणारा धोका* डॉ. अनिरुद्ध जोशींनी स्पष्टपणे मांडला आहे आणि आज साऊथ चायना सीमेमध्ये चीनची चाललेली दादागिरी, उत्तर कोरियाच्या आक्रमक हालचाली आणि दहशतवादाचे नंदनवन बनलेला पाकिस्तान ही सध्याची परिस्थिती पाहता या पुस्तकातून मांडलेले निष्कर्ष किती अचूक आहेत, हे जगाच्या समोर आले आहे. डॉ. अनिरुद्ध जोशींनी केलेल्या विश्लेषणानुसार जग ध्रुवीकरणाच्या दिशेने चालले असून यातून जगात मोठा उत्पात घडत आहे.
माहिती संकलन – ओमसिंह नवलाखे
*🌺हरिओम 🌺श्रीराम🌺 अंबज्ञ 🌺*
*🙌🙌नाथसंविध्🙌🙌*
*🙌🙌नाथसंविध्🙌🙌*
*🙌नाथसंविध्🙌*
साभार – WhatsApp