मोहन सावंत यांची `रेहॅबिलिटेशन अँड रिसर्च सेन्टर फॉर विमेन’ न्यासावर सरचिटणीसपदी नियुक्ती!

मुंबई:- रेहॅबिलिटेशन अँड रिसर्च सेन्टर फॉर विमेन अर्थात महिलांसाठी पुनर्वसन आणि संशोधन केंद्र ह्या विख्यात न्यासावर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन सावंत यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.

रेहॅबिलिटेशन अँड रिसर्च सेन्टर फॉर विमेन ह्या न्यासाच्या संस्थापक अध्यक्षा, मुंबईच्या माजी महापौर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, जेष्ठ सामाजिक नेत्या, जेष्ठ विधिज्ञ निर्मलाताई सामंत प्रभावळकर यांनी मोहन सावंत यांची नियुक्ती केली असून न्यासाच्या सभेत सर्व विश्वस्तांनी सर्वानुमते त्यास मंजुरी दिली.

रेहॅबिलिटेशन अँड रिसर्च सेन्टर फॉर विमेन ही सामाजिक विश्वस्त संस्था गेली २५ वर्षे महिलांच्या विविध प्रश्नावर देशभरात कार्य करीत आहे. महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जातात. तर महिलांच्या समस्यांवर अनेक संशोधनं करून ती शासनाला दिली जातात. त्यामुळे महिलांच्या समस्यांवर शासनाला उचित निर्णय घेणे सहजसोपे होते. अशा नामवंत संस्थेवर सरचिटणीसपदी निवड होणे ही कौतुकास्पद घटना आहे.

श्री. मोहन सावंत हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त कर्मचारी असून त्यांना आरोग्य विभाग, राज्य निवडणूक आयोग, मंत्रालय, राज्य महिला आयोग, म्हाडा येथे विविध शासकीय पदांवर काम केल्याचा दीर्घ अनुभव आहे. तसेच अनेक सहकारी संस्था व सेवाभावी सामाजिक संस्थांवर ते कार्य करीत आहेत. ते पाक्षिक `स्टार वृत्त’ ह्या वृत्तपत्रात सहसंपादक म्हणूनही काम पाहतात. मोहन सावंत उत्कृष्ट कबड्डी खेळाडू आणि आणि ब्लॅक बेल्ट कराटे चॅम्पियन आहेत. त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात दांडगा संपर्क आहे. त्यामुळे रेहॅबिलिटेशन अँड रिसर्च सेन्टर फॉर विमेन ह्या सामाजिक संस्थेचे कार्य अधिक गतिमान होईल.

“जेष्ठ विधिज्ञ निर्मलाताई सामंत प्रभावळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी संस्थेत प्रामाणिक आणि कार्यक्षमतेने कार्य करेन!” अशी प्रतिक्रिया मोहन सावंत यांनी आमच्या प्रतिनिधीकडे दिली. ह्या निवडीनंतर मोहन सावंत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!