महासिद्धयोगी स्वामी गगनगिरी महाराज दर्शन सोहळा सप्ताह!
परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सिध्द तपोवन, मनोरी आश्रम तीर्थक्षेत्र मनोरी डोंगर, मालाड पश्चिम येथे `दर्शन सोहळा सप्ताह’ उत्सवात सहभागी होण्याचे मंगलमय निमंत्रण!
मुंबई:- महासिद्धयोगी स्वामी गगनगिरी महाराज दर्शन सोहळा सप्ताह गुरुवार ०२ ऑक्टोबर ते बुधवार ०८ऑक्टोबर २०२५ दरम्यान परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सिध्द तपोवन, मनोरी आश्रम तीर्थक्षेत्र मनोरी डोंगर, मालाड पश्चिम येथे होणार आहे. `दर्शन सोहळा सप्ताह’ उत्सवात सहभागी होण्याचे मंगलमय निमंत्रण परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम चॅरिटेबल ट्रस्टने दिले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा-
गुरुवार ०२ ऑक्टोबर- स्वामींची पालखी मिरवणूक आणि श्रीसत्यनारायण महापूजा
शुक्रवार ०३ ऑक्टोबर- भजन / कीर्तन
शनिवार ०४ ऑक्टोबर- छप्पन्न भोग नैवेद्य अर्पण सोहळा आणि नृत्यसंकिर्तन
रविवार ०५ ऑक्टोबर- सामूहिक श्रीसत्यनारायण महापूजा
सोमवार ०६ ऑक्टोबर- लक्ष लक्ष दीप सोहळा
मंगळवार ०७ ऑक्टोबर– गुरुसप्तशती पारावण आणि जयमल्हार जागरण गोंधळ
बुधवार ०८ ऑक्टोबर- नवचंडी यज्ञ / काल्याचे कीर्तन आणि सांगता समारंभ
विश्वशांती आणि मानवकल्याणाकरिता तसेच मुंबई शहरातील जनतेला निसर्गाचा आनंद आणि स्वतःची अध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच नैतिक प्रगती करता यावी, ह्यासाठी मनोरी आश्रमाची स्थापना प.पू. स्वामी गगनगिरी महाराजांनी स्वतः केली.
“बाबांनो तुम्ही मला बोलावता, म्हणून मी येथे येतो!”- महासिद्धयोगी स्वामी परमपूज्य गगनगिरी महाराज
“बाबांनो तुम्ही मला बोलावता, म्हणून मी येथे येतो!” हे भक्तांना उद्देशून केलेले महाराजांचेच शब्द आहेत. म्हणून गेली ३२ वर्ष या मनोरी आश्रमात महासिद्धयोगी स्वामी गगनगिरी महाराज दर्शन सोहळा सप्ताह साजरा होत असतो. ह्या सोहळ्यादरम्यान प. पू.स्वामी गगनगिरी महाराज साक्षात येथे मुंबईमधील भाविकांना आशीर्वादरूपी दर्शन देत असत व भाविक भक्तगण होम-हवन, पूजन आणि अन्नदानाचा लाभ घेत असत! अजूनही हीच भावना मनात ठेवून सर्व सेवेकरी आणि भाविक हा सोहळा श्रद्धेने साजरा करत आहेत आणि हर्ष उल्हासात महोत्सव साजरा करताना महाराजांचे स्नेह आणि आशीर्वाद व कृपा मिळवितात.
सर्व भाविकांनी ह्या सोहळ्यात सहभागी होऊन आदिदत्तात्रय सद्गुरू प. पू. स्वामी गगनगिरी महाराजांचे स्नेह आणि आशिर्वाद प्राप्त करून परमोच्च अशा अलौकिक आध्यात्मिक सोहळ्याचा आनंद घ्यावा; अशी सदिच्छा परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम चॅरिटेबल ट्रस्टने व्यक्त केली आहे.