महाराष्ट्राचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन
शेतकऱ्यांचा नेता काळाच्या पडद्याआड
मुंबई:- महाराष्ट्राचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर याचं हृदयविकाराच्या झटक्याने आज पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण आज पहाटे हृदयविकाराचा झटका आल्याने फुंडकर यांचं निधन झालं आहे. फुंडकर यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक खंबीर शेतकरी नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांसाठी पांडुरंग फुंडकर यांनी सातत्याने कार्य केले. त्यामुळे शेतकऱ्यांचा त्यांना नेहमीच पाठिंबा असायचा. अशा शेतकरी नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली!