डेहराडून राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज प्रवेशासाठी पात्रता परीक्षा

मुंबई:- महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून (उत्तरांचल) येथे आठवीसाठी प्रवेश पात्रता परीक्षा दिनांक १ डिसेंबर आणि २ डिसेंबर २०१८ रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. ही परीक्षा फक्त मुलांसाठी आहे.

ज्या विद्यार्थ्यांचे वय १ जुलै २०१९ रोजी ११.५ (अकरा वर्ष सहा महिने) पेक्षा कमी आणि १३ वर्षापेक्षा अधिक नाही असे विद्यार्थी सदर परीक्षेस पात्र समजण्यात येतील. परीक्षेस बसणाऱ्या मुलांचा जन्म २ जुलै २००६ ते १ जानेवारी २००८ या कालावधीतील असणे आवश्यक असून सदर विद्यार्थी १ जुलै २०१९ ला कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता ७ वी या वर्गात शिकत असावा किंवा ७ वी उत्तीर्ण असावा.

परीक्षेसाठी राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांची विहीत नमुन्यातील अर्ज घ्यावयाची असून विद्यार्थ्यांस महाराष्ट्र राज्य शिक्षा परीषद कार्यांलयामार्फत अर्ज उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या आवेदनपत्रासोबत अनुसूचित जाती/जमातीतील विद्यार्थ्यांनी ५५५/- रुपये आणि खुला गटातील विद्यार्थ्यांनी ६००/- रुपयांचा डिमांड ड्राफ्ट देणे आवश्यक आहे. सदर ड्राफ्ट फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचाच असावा. सदर ड्राफ्ट ‘कमांडंट,आर.आय.एम.सी., डेहराडून’ यांच्य नावे काढावा आणि त्या ड्राफ्टवर पेअेबल ॲट डेहराडून (तेलभवन बँक Code No 01576)अशी नोंद असावी. दोन प्रतीत आवेदनपत्रासोबत जन्मतारखेच्या व जातीच्या दाखल्याची (अनुसूचित जाती/जमातीसाठी) छायांकित प्रत, शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट आणि अधिवासाच्या दाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे. परिपूर्ण भरलेले अर्ज ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, १७ डॉ.आंबेडकर मार्ग, लाल देवळाजवळ, पुणे- ४११००१ यांच्याकडे पाठवावीत.

याशिवाय अर्ज, माहितीपत्र व ५ वर्षाच्या प्रश्नपत्रिका संच ड्राफ्ट प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयाकडून स्पीड पोस्टाने पाठविण्यात येतील. तसेच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका संच राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून, उत्तरांचल २४८००३ यांच्याकडूनही प्राप्त करुन घेता येऊ शकतील. मुदतीनंतर कोणतीही अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारण्यात येणार नाहीत.

या परीक्षेसाठी इंग्रजी, गणित आणि सामान्यज्ञान या तीन विषयांचे लेखी पेपर असतील. परीक्षार्थींना गणिताचा व सामान्यज्ञानाचा पेपर इंग्रजी अथवा हिंदीमध्ये लिहिता येईल. गणित व सामान्यज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध होतील. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती ४ एप्रिल २०१९ रोजी घेण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. (‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *