गरजेपुरता देव
अलक्ष्मी पैसा देते तेव्हा समाधान, तृप्ती, शांती देत नाही.
अपवित्र मार्गाने आलेलं कुठल्याही प्रकारचं धन कधीही सुखशांती देऊ शकत नाही. तृप्ती देऊ शकत नाही. तुम्हाला सगळी सुखाची साधनं प्राप्त होतील, पण सुख मिळणार नाही.
एखाद्याकडे मोठे दहा नाही दहाशे बंगले असतील, दहा हजार सगळ्यात प्रसिद्ध गाड्या असतील, दहा हजार नोकर चाकर असतील, ही सगळी सुखाची साधनं आहेत. सुख नव्हे. सुखाची साधनं मिळणं वेगळं.
अलक्ष्मी फक्त सुखाची साधनं देते. लक्ष्मी सुख देते आणि आवश्यक तेवढीच साधनं देते.
-परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू
प्रवचन ता. २६/११/२००९