महाराष्ट्रातील ४ तुरूंग कर्मचाऱ्यांना सुधारक सेवा पदक जाहीर
नवी दिल्ली:- देशभरातील ३६ तुरूंग अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुधारक सेवा पदके जाहीर झाली असून यामध्ये महाराष्ट्रातील ४० तुरूंग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला देशभरातील उत्कृष्ट कार्य केलेल्या ३६ तुरूंग अधिकरी-कर्मचाऱ्यांना सुधारक सेवा पदके जाहीर झालेली आहेत. यात ५ तुरूंग अधिकाऱ्यांना असामान्य सेवेसाठी राष्ट्रपती सेवा पदक तर उल्लेखनीय सेवेसाठी ३१ तुरूंग अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुधारक सेवा पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ४ तुरूंग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे सुभेदार कलप्पा मलकप्पा कुंभार, मुंबई जिल्हा महिला कारागृहाचे हवालदार कैलास शालिक बाऊस्कर, नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे शिपाई संजय राजारामजी तलवारे, शिपाई राजू विठ्ठल हाटे या तुरूंग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.