जगातील प्रथम अभियंता महिलेच्या जयंती निमित्ताने गुगलचे खास डुडल
जगातील प्रथम महिला अभियंता एलिसा लियोनिडा जैमफिरेस्क्यू (Elisa Leonida Zamfirescu) यांची १३१ वी जयंती असून त्या निमित्त गुगलने आज एक विशेष डुडल प्रसिद्ध केले आहे.
एलिसा यांचा जन्म १० नोव्हेंबर २०१८ रोजी रोमानियाच्या गलाटी शहरात झाला होता. त्यांचा मृत्यू २५ नोव्हेंबर १९७३ साली राजधानी बुखारेस्ट येथे झाला. त्यांना आपल्या जीवनात अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्या संघर्षातून त्यांचे जीवन अधिकाधिक उजळून निघाले. त्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात बहुमोल योगदान दिले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुगलने डुडलमार्फत दिलेल्या आगळ्यावेगळ्या स्मृती चित्रासाठी धन्यवाद!