`सद्गुरुच असतो तारणहार’ ह्याची शिकवण देणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे माहात्म्य

गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्तसंप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते. पारायणाचे वेळी सप्ताहाचे बंधन असण्याने अर्थ-चिंतन करायला अवसर नसतो. म्हणून उपासनेचाच एक भाग या दृष्टिकोनातून ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा. श्रीपादश्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती, श्रीस्वामी समर्थ या दत्तावतारी-सत्पुरुषांनी भक्तांवर कृपादृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागे कृपाशक्तीही उभी केली. तिला चमत्कार असे म्हटले गेले आहे. पण हे चमत्कार श्रद्धेच्या वाढीसाठी असून त्यायोगे भक्तांची मनोकामना पूर्ण होते हा एक भाग; पण मनोकामना पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरुसेवा/ गुरूउपासना अखंडपणे चालू ठेवून आत्मज्ञानप्राप्ती करून घेतली पाहिजे. म्हणूनच गुरूंनी केलेल्या चमत्कारांमागील भक्तिसूत्र शोधून घेऊन त्यांतील गुरुबोध जाणून घ्यायला हवा. गुरु-शिष्य संवाद हा त्यासाठीच असतो.

दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा १४८०च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना ‘ज्ञानेश्वरी’ व ‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे.

या प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे.

गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते

१. आपली चूक नसताना दुसर्याकडून झालेला त्रास, हे आपलेच प्रारब्ध असते.
२. आपण मदत करत नसतो, तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते.
३. आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते.
४. यांत्रिक पणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा.
५. मनुष्य रूपातच बहुतेक गुरू भेटतात, पण कुणाला तरी गुरू मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते. इथेच गल्लत होते. पण योग्य गुरू भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते. (आचरेकर सरांनी गालात मारलेली होती तरीही सचिन आज पाय धरतो. त्यांची चिकित्सा करत नाही).
६. काळ हा परमेश्वरलाही चुकला नाही, इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे.
७. आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित करवतात. त्याला पर्यायी उपाय नाही.
८. नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जग राहाटी चालवावी हेच सांगितले.
९. महाराज वैश्विक शक्तीच्या सुचनेने राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या. मुख्य कार्य ठरलेले होते.
१०. अवतार हे काळाप्रमाणे होतात. दर वेळी एकाच रुपात येत नाहीत.
११. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे. अध्यात्म हा पाया आहे पण जग रहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र (जे असेल ते) आनंदाने निभवावे, पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल.

श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती

★अध्याय १:- नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते.
★अध्याय २:- कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात.
★अध्याय३:- गुरुकोपाचे शमन होते. व व्रताची पूर्तता होते.
★अध्याय ४:- स्त्रीछलणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते.
★अध्याय ५:- शाररिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते.
★अध्याय ६:- दैवी कोप दूर होतो. व विद्याप्राप्ती होते.
★अध्याय ७:- पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात.
★अध्याय ८:- बुध्दिमांद्य नाहिशे होतात. विवाह कार्य सुलभ होते.
★अध्याय ९:- सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात.
★अध्याय १०:- नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो.
★अध्याय ११:- वाचंदोष तसेच,वेड नाहीसे होते.
★अध्याय १२:- संकटे, दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते.
★अध्याय १३:- सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात.
★अध्याय १४:- प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते.
★अध्याय १५:- तिर्थयात्रांना सफलता प्राप्त होते.
★अध्याय १६:- आदरणीयची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो.
★अध्याय १७:- ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो.
★अध्याय १८:- संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहिशे होते.
★अध्याय १९:- भाग्य वृद्धी होते. सद्गुगुरूंचा लाभ होतो. त्रीस्थळी यातरपुण्य लाभते.

श्री गुरुचरित्रातील अध्यायतील फलश्रुती
गुरुचरित्र कथा प्रसंग- अध्याय २०, ओवी ५ वी
★अध्याय २०:- गुरूस्मरण करुनी मनी, पूजा करी वो गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मासमंध परिहरेल!!
★अध्याय २१:- मृत्यूभयापासून मुक्तता .
★अध्याय २२:- वांझपण दूर होते. बाळणतिनिला चांगले दूध येते.
★अध्याय २३:- पिशाच्चबाधा नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते.
★अध्याय २४:- भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते.
★अध्याय २५:- अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात.
★अध्याय २६:- शत्रू निषभ्रम होऊन शरण होतात.
★अध्याय २७ :- गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्दानाचा छळ दोषांची निवृत्ती.
★अध्याय २८:- वाईट कर्माचे दोष दूत होतात , सप्तथ सापडतो.
★अध्याय २९:- स्त्रीछलदोष , वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते.
★अध्याय ३०:- कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते.
★अध्याय ३१:- पतीवर येणारे विघ्ने टळतात.
★अध्याय ३२:- वैधव्याचे दुःख टळते. अथवा सुसह्य होते.
★अध्याय ३३:- वचनभँग व व्यभिचार दोष दूर होऊन सदगती लाभते.
★अध्याय ३४ :- प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते.
★अध्याय ३५ :- हरवलेले , नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तूटलेले संबंध जुळतात.
★अध्याय ३६:- चूकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते.
★अध्याय ३७:- मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते.
★अध्याय ३८:- निदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते.
★अध्याय ३९:- सद्गुगुरु ची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो .
★अध्याय ४०:-कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते.
★अध्याय ४१:- सद्गुगुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो.
★अध्याय ४२:- विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारिला यश येते.
★अध्याय ४३:- गर्व व क्रोध नाहीसा होऊन एशवर्या ची प्राप्ती होते.
★अध्याय ४४:- मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो.
★अध्याय ४५:- कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते. बुद्धी वाढते.
★अध्याय ४६:- चिंताची स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते.
★अध्याय ४७:- पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते.
★अध्याय ४८:- गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते.विघ्ने टळते.
★अध्याय ४९:- तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे समान होते.
★अध्याय ५०:- ग्रँथी रोग , त्वचारोग नष्ट होऊन शरीरसुख लाभते.
★अध्याय ५१:- सुखसमृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते.
★अध्याय ५२ :- श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते.

गुरुचरित्र अन्वयार्थ

प्रत्येक अध्यायात सुरुवातीला आणि शेवटी एकच मुद्दा अधोरेखित केला आहे की,

“अरे ! काही करू नकोस , तुझ्या सद्गुरुना शरण जा. तुझी श्रद्धा; भक्ती; एकाग्रता एवढी वाढव की त्या सद्गुरुनी सांगितलेला प्रत्येक शब्द फुलासारखा झेलता आला पाहिजे. कदाचित त्या फुलात काटे असतील ते तुला टोचतील, तरीसुद्धा तू तक्रार करू नकोस. कारण ते काटेसुद्धा तुझ्या अंतिम हितासाठीच असतील.”

गुरुचरित्राच पठण करणाऱ्या प्रत्येकाने आत्मशोधन करावे की, नेमके कशासाठी हे पठण करतो आहोत. आपला नेमका हेतू काय आहे ? तो शाश्वत आणि भव्य स्वरूपाचा आहे की संकुचित आणि अशाश्वत आहे. हे आत्मशोधन नित्य पठणाआधी भक्त करू शकला तर श्रीगुरूचरित्राच्या वाचनातून त्याला त्याच्या प्रगतीचा मार्ग आपोआप उलगडत जाईल नव्हे तर सद्गुरु तत्वाकडून काळजी घेतली जाईल, हे निश्चित. आपल्या पूर्व कर्माच्या प्रतिक्रिया ज्या दिवशी संपतील त्या दिवशी आपण आणि सद्गुरु / परमात्मा एकच होऊन जाल. पण तत्पूर्वी आपणच लावलेली पापाची बीजं भोगुन संपवावी लागतात. सत्कर्माने त्या बीजांची झालेली झाडे नष्ट करता येतात पण बीज मात्र भोगूनच संपवावे लागते. पूर्वकर्माची निष्कृती झाली की मग “मी तू पणाची झाली बोळवण” अशी अवस्था येते. तुमच्यात आणि सद्गुरुत वेगळेपणा उरतच नाही. तुम्ही संपूर्ण एकरूप झालेले असता. (साभार -http://www.dattamaharaj.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *