नरेंद्र मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प सादर!
अर्थसंकल्प आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केला सादर
नवीदिल्ली:- नरेंद्र मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला. अनेक नव्या योजनांची, अनेक वस्तूंच्या किंमतीत कपात करण्याची, पेट्रोल-डिझेलच्या अतिरिक्त करात वाढ करण्याची, सोन्याच्या वस्तूंची एक्साईज ड्यूटीत वाढ करण्याची घोषणा करीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दोन तास १० मिनिटापर्यंत केलेल्या भाषणात मोदी सरकारचे अर्थविषयक धोरण देशासमोर मांडले.
अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे;
ट्रॅव्हेल्स बॅग, कंटेनर, स्वंयपाक घरातील भांडे, चादर, चश्म्याची फ्रेम, खोबरे (सुके), पास्ताकपडे धुण्याचे पावडर, टूथपेस्ट, हेअर ऑईल, शाम्पू, सॅनिटरी नॅपकीन, गृहकर्ज, इलेक्ट्रिक कार, साबण, पंख्याचे सामान स्वस्त झाले
तर पेट्रोल, डिझेल, सोने, चांदी, पिव्हीसी, धातूंच्या वस्तू, फ्रेमचे सामान, वाहनाचे हॉर्न, एअर कंडिश्नर (एसी), लाउडस्पीकर, व्हिडिओ रेकॉर्डर, सीसीटीव्ही कॅमेरा, सिगारेट, तंबाखू, ऑप्टिकल फायबर, ऑटो पार्ट्स, टाईल्स, स्टेनलेस उत्पादन, सिंथेटिर रबर महाग झाले आहेत.