टीव्ही जर्नलिस्ट असो. च्या दिनदर्शिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई:- टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मंत्रालयात झाले. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे, महासचिव प्रशांत पांडेय, खजिनदार कल्पेश हडकर, कार्यकारणी सदस्य अतुल कदम व आतिश चतुर यावेळी उपस्थित होते. टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या दिनदर्शिकेचे हे सहावे वर्ष असून यात मुंबईतील दूरचित्र वाहिन्यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.











