महाराष्ट्रात कोरोना बाधीत रुग्ण १ लाख ४७ हजार ७४१; आज ४ हजार ८४१ नवे रुग्ण

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या विक्रमी; आज ३६६१ जणांना घरी सोडले

मुंबई:- राज्यात सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी संख्येत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज एकाच दिवशी ३६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत ७७ हजार ४५३ रुग्ण बरे झाले आहेत. आजही मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात सर्वाधिक २८४४ रुग्ण घरी सोडले. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सध्या ६३,३४३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. राज्यातील कोरोना बाधीत रुग्णांची एकूण संख्या १,४७,७४१ झाली आहे. आज ४,८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले.

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ५२ टक्के एवढा असून राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

आज सोडण्यात आलेल्या ३६६१ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात २८४४ (आतापर्यंत एकूण ५४ हजार ५८१) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ४०१ (आतापर्यंत एकूण ११ हजार ७००), नाशिक मंडळात १४२ (आतापर्यंत एकूण ३७९४), औरंगाबाद मंडळ ७७ (आतापर्यंत एकूण २६३९), कोल्हापूर मंडळ ३२ (आतापर्यंत एकूण १४१५), लातूर मंडळ ६८ (आतापर्यंत एकूण ६००), अकोला मंडळ ६८ (आतापर्यंत एकूण १५१६), नागपूर मंडळ २९ (आतापर्यंत एकूण १२०८) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *