कणकवली स्टेट बँकेमध्ये ग्राहकांच्या सेवेत सुधारणा करण्याची मागणी

ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने स्टेट बँक शाखा अधिकाऱ्यांना निवेदन

कणकवली:- स्टेट बँकेमध्ये ग्राहकांच्या सेवेत सुधारणा करण्याची मागणी ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने स्टेट बँक शाखा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कणकवली शाखेमध्ये गेले कित्येक दिवस एकच कॅश काऊंटर सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातच स्टेट बँकेतील शाखेमधील कर्मचारी कार्यक्षमपणे कामकाज करीत नाहीत. त्यामुळे एकाच ठिकाणी अपंग, जेष्ठ नागरिक, पेंशनर्स व इतर ग्राहकांना तासनतास उभे राहावे लागते. त्यांना नाहक त्रास होत आहे. म्हणूनच जेष्ठ नागरिक, अपंग, पेशनर्स यांच्यासाठी तरी किमान वेगळी व्यवस्था करणेत यावी व त्यांचे होणारे हाल थांबवावेत, अशी मागणी ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने कणकवली-स्टेट बँक शाखाधिकारी श्री. चौधरी यांची भेट घेऊन करण्यात आली. बॅकेतील जेष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, पेन्शनर व्यक्ती यांच्यासाठी वेगळा काऊंटर मिळावा व कर्मचाऱ्यांची वागणूक सुधारावी म्हणून निवेदनही देण्यात आले. त्यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा महिला संघटक सौ गीतांजली कामत, कणकवली तालुकाध्यक्ष परेश परूळेकर, कणकवली तालुका उपसचिव सौ.संजना सदडेकर, निरिक्षक निसार शेख, महिला संघटक सौ. सुप्रिया पाटील, सदस्य मनोज वारे, प्रकाश साखरे उपस्थित होते.

कणकवली-स्टेट बँक शाखाधिकारी श्री. चौधरी यांच्याशी ह्या समस्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती कणकवली तालुकाध्यक्ष परेश परूळेकर यांनी माध्यमांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *