व्यापाऱ्यांच्या निःस्वार्थ सहकार्याने नांदगाव बाजार बंदला प्रतिसाद!

श्रेय घेणाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारण्याची हिंमत दाखवावी! 

नांदगाव (प्रतिनिधी) – नांदगाव बाजार बंद ठेवण्यासाठी तेथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आसिफ बटवाले यांनी सर्व व्यापारांना आणि रिक्षा संघटनेला विश्वासात घेतले आणि त्यांना सर्वांनी साथ दिली म्हणूनच नांदगाव बाजार बंदला उत्तम प्रतिसाद लाभला. मात्र एका स्थानिक पुढाऱ्याने त्याचे श्रेय स्वतः घेण्यास धन्यता मानली. श्रेय घेणाऱ्यांने नांदगाव दशक्रोशीत कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढला त्याचीही जबाबदारी स्वीकारण्याची हिंमत दाखवावी; असे आवाहन नांदगावचे व्यापारी नेते बाळा मोरये यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले आहे. 

१ जून ते ८ जून दरम्यान नांदगाव बाजार बंद ठेवण्यासाठी जी सभा झाली त्यात अनधिकृत दारू व्यवसाय बंद करण्याबाबत काही व्यापारांनी मुद्दे उपस्थित केले आणि जोपर्यंत अनधिकृत दारू व्यवसाय बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही व्यापारी दुकाने बंद ठेवणार नाही; अशी समाजाच्या हिताची भूमिका मांडली. त्यानंतर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आसिफ बटवाले यांनी सर्व व्यापारांना आणि रिक्षा संघटनेला विश्वासात घेतले. त्यांची समजूत काढून उगाचच व्यापाऱ्यांना बदनाम केले जाईल आणि त्यांच्यावर जबाबदारी ढकलली जाईल; ह्या शुद्ध भावनेने नांदगावमधील अनेक जेष्ठ समाजसेवकांनी पुढाकार घेतला. त्यामुळे बंदला उत्फुर्त प्रतिसाद लाभला.

नांदगाव येथे कोरोनाचा एवढा मोठा प्रसार झाला; मग एवढे दिवस प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) का जाहीर झाले नाही? (सदर बातमी लिहिताना प्रतिबंधित क्षेत्राचा फलक आरोग्य खात्याने लावला.) असा सवाल येथील जनतेचा असून श्रेय घेणाऱ्यांने नांदगाव दशक्रोशीत कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढला, त्याचीही जबाबदारी स्वीकारण्याची हिंमत दाखवावी; असे आवाहन नांदगावचे व्यापारी नेते बाळा मोरये यांनी केले आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधित लसीकरण अत्यंत उपयुक्त आहे. नांदगाव येथे सुरुवातीपासून कोरोना रुग्ण सापडले होते. मग येथे लसीकरणासाठी विशेष प्रयत्न का केले गेले नाहीत? मतदानासाठी वाहनांची सोय करणारे नेते लसीकरणासाठी वृद्धांना नेण्यासाठी वाहनांची सोय का करू शकले नाहीत? लसीकरणाबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण का करू शकले नाहीत? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

नांदगाव प्रा. आ. केंद्र कक्षेतील गावात ९३ रुग्ण कोरोना सक्रिय असल्याचे सांगून एका वृत्तपत्राने अर्धसत्य सांगून नांदगावात भीतीदायक वातावरण निर्माण केले आहे. त्यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीने आरोग्य विभागाकडून आकडेवारी घेतली. ती खालीलप्रमाणे आहे;

प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव अंतर्गत येणारी गावे व (२ जून २०२१ पर्यंतची) आकडेवारी   

१) नांदगाव- आजपर्यंतचे पॉजिटीव्ह आलेले रुग्ण-१६३, बरे झालेले रुग्ण-१३९, सक्रिय रुग्ण-१४ (रुग्णालयात-१२+होम आयसोलेशन-२), मृत्यू-१०.

२) बेळणे – आजपर्यंतचे पॉजिटीव्ह आलेले रुग्ण-०९, बरे झालेले रुग्ण-०९.

३) बावशी- आजपर्यंतचे पॉजिटीव्ह आलेले रुग्ण-१९, बरे झालेले रुग्ण-१६, सक्रिय रुग्ण-०२ (रुग्णालयात-०+होम आयसोलेशन-२), मृत्यू-०१.

४) ओटव- आजपर्यंतचे पॉजिटीव्ह आलेले रुग्ण-२८, बरे झालेले रुग्ण-१९, सक्रिय रुग्ण-०८ (रुग्णालयात-०८+होम आयसोलेशन-०), मृत्यू-०१.

५) माईण- आजपर्यंतचे पॉजिटीव्ह आलेले रुग्ण-१३, बरे झालेले रुग्ण-०९, सक्रिय रुग्ण-०३ (रुग्णालयात-०३+होम आयसोलेशन-०), मृत्यू-०१.

६) असलदे- आजपर्यंतचे पॉजिटीव्ह आलेले रुग्ण-२९, बरे झालेले रुग्ण-२३, सक्रिय रुग्ण-०६ (रुग्णालयात-०+होम आयसोलेशन-६), मृत्यू-००.

७) करूळ- आजपर्यंतचे पॉजिटीव्ह आलेले रुग्ण-२५, बरे झालेले रुग्ण-१३, सक्रिय रुग्ण-१२ (रुग्णालयात-०९+होम आयसोलेशन-३), मृत्यू-००.

८) कोंडये- आजपर्यंतचे पॉजिटीव्ह आलेले रुग्ण-०१, बरे झालेले रुग्ण-०१.

९) तिवरे – आजपर्यंतचे पॉजिटीव्ह आलेले रुग्ण-०९, बरे झालेले रुग्ण-०९.

१०) डामरे – आजपर्यंतचे पॉजिटीव्ह आलेले रुग्ण-२१, बरे झालेले रुग्ण-२१.

११) सावडाव- आजपर्यंतचे पॉजिटीव्ह आलेले रुग्ण-०३, बरे झालेले रुग्ण-०२, सक्रिय रुग्ण-००, मृत्यू-०१.

१२) तरंदळे- आजपर्यंतचे पॉजिटीव्ह आलेले रुग्ण-४७, बरे झालेले रुग्ण-२८, सक्रिय रुग्ण-१५ (रुग्णालयात-११+होम आयसोलेशन-४), मृत्यू-०४.

१३) साकेडी- आजपर्यंतचे पॉजिटीव्ह आलेले रुग्ण-२५, बरे झालेले रुग्ण-१८, सक्रिय रुग्ण-०६ (रुग्णालयात-०२+होम आयसोलेशन-०४), मृत्यू-०१.

१४) हुंबरठ- आजपर्यंतचे पॉजिटीव्ह आलेले रुग्ण-२८, बरे झालेले रुग्ण-१९, सक्रिय रुग्ण-०७ (रुग्णालयात-०३+होम आयसोलेशन-०४), मृत्यू-०२.

१५) आयनल- आजपर्यंतचे पॉजिटीव्ह आलेले रुग्ण-३२, बरे झालेले रुग्ण-०६, सक्रिय रुग्ण-२५ (रुग्णालयात-२५+होम आयसोलेशन-००), मृत्यू-०१.

१६) कोळोशी- आजपर्यंतचे पॉजिटीव्ह आलेले रुग्ण-१८, बरे झालेले रुग्ण-१५, सक्रिय रुग्ण-०३ (रुग्णालयात-०३+होम आयसोलेशन-००).

१७) भरणी- आजपर्यंतचे पॉजिटीव्ह आलेले रुग्ण-३८, बरे झालेले रुग्ण-३५, सक्रिय रुग्ण-०१ (रुग्णालयात-०१), मृत्यू-०२.

एकूण- आजपर्यंतचे पॉजिटीव्ह आलेले रुग्ण-५०८, बरे झालेले रुग्ण-३८२, सक्रिय रुग्ण-१०२ (रुग्णालयात-७७+होम आयसोलेशन-२५), मृत्यू-२४.

वरील सतरा गावांची एकत्रित आकडेवारी देण्यात आली. पण सतरा गावांची नावे किंवा गावानुसार आकडेवारी देण्यात आली नाही. ह्यालाच म्हणतात अर्धसत्य सांगून भीतीचे वातावरण तयार करणे.

शेजारी कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या १७ गावांमध्ये (३ जून २०२१) पर्यंतची एकूण आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. एकूण- आजपर्यंतचे पॉजिटीव्ह आलेले रुग्ण-५२५, बरे झालेले रुग्ण-४०६, सक्रिय रुग्ण-१०२ (रुग्णालयात-८४+होम आयसोलेशन-१८), मृत्यू-१७.

ही आकडेवारी पाहिल्यास काही प्रसिद्धी माध्यमं सुद्धा ठराविक तथाकथित नेत्यांना मोठं करण्यासाठी कशी राबतात? ते सहजपणे लक्षात येते!