बँक खाते, मोबाईल क्रमांक आधारला सलग्न करुन घेण्याचे रिक्षा चालकाना आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) – कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना एक वेळचे अर्थसहाय्य म्हणून आर्थिक मदत 1 हजार 500 रुपये शासनाने जाहीर केले आहे. त्यासाठी बँक खाते, मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी सलग्न असणे अनिवार्य आहे. तरी जिल्ह्यातील रिक्षा चालकांनी मोबाईल क्रमांक व बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावा असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांनी केले आहे.

आधार क्रमांक जोडणीची सुविधा जिल्ह्यातील पुढील केंद्रांवर उपलब्ध आहे.

कुडाळ तालुक्यात आरटीओ कार्यालय, सिंधुदुर्गनगरी, आरटीओ कार्यालयातील आधार केंद्र दि. 16 जून ते 25 जून पर्यंत सरू राहणार आहे. पशुवैद्यकीय दवाखाना, वाडोस, ग्रामपचंयात कडावल, ग्रापंचायत साळगाव, ग्रामपंचायत परबवाडा.

वेंगुर्ला तालुक्यात तलाठी कार्यालय, उभादांडा, ग्रामपंचायत परुळेबाजार, तलाठी कार्यालय शिरोडा, पंचायत समिती, वेंगुर्ला, ग्रामपंचायत दाभोली, तलाठी आणि मंडल अधिकारी कार्यालय, वेतोरे.

कणकवली तालुक्यात तहसील कार्यालय, कणकवली, आर.पी.उबाळे विद्यामंदिर, कणकवली, पंचायत समिती कार्यालय, कणकवली, ग्रामपंचायत फोंडाघाट, ग्रामपंचायत तळेरे.

सावंतवाडी तालुक्यात ग्रामंपचायत बांदा, तहसील कार्यालय सावंतवाडी, ग्रामपंचायत तळवडे, ग्रामपंचायत कोलगाव, तलाठी कार्यालय, सातार्डा, ग्रामपंचायत मळगाव.

देवगड तालुक्यात तहसील कार्यालय देवगड, मंडळ अधिकारी कार्यालय तळेबाजार, मंडळ अधिकारी कार्यालय, शिरगाव, तलाठी कार्यालय तळेबाजार, मंडळ अधिकारी कार्यालय पडेल.

मालवण तालुक्यात नगरपरिषद मालवण.

दोडामार्ग तालुक्यात तहसील कार्यालय, दोडामार्ग, पंचायत समिती दोडामार्ग.

या सर्व ठिकाणी आधार क्रामांकाशी मोबाईल क्रमांक व बँक खाते जोडून घेता येणार आहे. जिल्ह्यातील रिक्षा चालकांनी व वरील आधार केंद्र चालकांनी लॉकडाऊनचे नियम पाळून व कोविड संदर्भातील केंद्र, राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्सक सूचना पाळून आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांक व बँक खाते क्रमांक जोडून शासनाने देऊ केलेल्या अर्थसहाय्यासाठी अर्ज करावेत असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांनी केले आहे.