पश्चिम रेल्वे स्थानीय लोकाधिकार समितीच्या चिटणीसपदी राकेश कांबळी यांची नियुक्ती

मुंबई (प्रतिनिधी):- स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते व खासदार गजानन कीर्तिकर, महासंघाचे कार्याध्यक्ष आनंदराव अडसूळ आणि सरचिटणीस, शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई यांच्या संमतीने पश्चिम रेल्वे स्थानीय लोकाधिकार समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

त्या कार्यकारिणीच्या चिटणीसपदी क्षा. म. समाजाचे तडफदार रोखठोक नेतृत्व करणारे आणि निष्ठावंत शिवसैनिक राकेश कांबळी यांची नियुक्ती झाली असून त्यांचे सर्व थरातून कौतुक होत आहे. त्यांचे पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवाराकडून संपादक नरेंद्र हडकर आणि क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संघटन संकेतस्थळाचे मुख्य संचालक सुरेश डामरे यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.