ग्राहकांच्या तक्रारींची निर्गती प्रत्येक विभागाने करावी! – दादासाहेब गिते

सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) – विविध विभागांकडे ग्राहकांच्या अनेक तक्रारी येत असतात. प्रत्येक विभागाने या तक्रारींची निर्गती आपल्या स्तरावर करावी, अशी सूचना जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव दादासाहेब गिते यांनी केली.

येथील परिषद सभागृहात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे बैठक आज झाली. याबैठकीला पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, नंदकिशोर करवडे, बीएसएनएलचे आरविंद पाटील, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे आदी उपस्थित होते.

ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण होण्याबाबत काही सूचना त्याच बरोबर काही अडचणी येत असतील तर त्या लेखी स्वरुपात परिषदेकडे सादर कराव्यात. त्याबाबत शासनाला कळविण्यात येईल. ग्राहकानेही कोणतीही वस्तू खरेदी करताना पक्की पावती घ्यावी. पक्की पावती मिळत नसेल तर खरेदी करू नये, असेही श्री. गिते यांनी आवाहन केले.