पर्यावरण मंत्र्यांकडून 10 व डीपीसीतील 9 व्हेंटिलेटर्सचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.):- कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 10 व्हेंटिलेटर्स जिल्ह्यासाठी पाठविले आहेत. तसेच जिल्हा नियोजनमधील 9 व्हेंटिलेटर्स अशा 19 व्हेंटिलेटर्सचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांनी खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत केले.

हे व्हेंटिलेटर्स गरजेनुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालयात बसविण्यात येणार असून यामुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर वाढवण्यास निश्चितपणे मदत होणार आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page