आप्पासाहेब श्रीसाईअनिरुद्धाचे चरणी विलीन…

|| हरि ॐ || || श्रीराम|| ||अंबज्ञ||

शिर्डीचे श्रीसाईनाथ यांच्या प्रत्यक्ष परवानगी घेऊन हेमाडपंतांनी श्री साईनाथांचे चरित्र अर्थात श्रीसाईसच्चरित लिहिले. हेमाडपंतांचे नातू गोविंद गजानन दाभोलकर म्हणजेच सद्यपिपा आप्पासाहेब यांचे काल सायंकाळी साडेसहा वाजता निधन झाले. त्यांना पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!

आमचा खराखुरा मार्गदर्शक, भरपूर निर्मळ प्रेम देणारे, पाठीवरून मायेने हात फिरविणारे, स्वतः बनवून नास्ता-चहा देणारे आणि सदैव परमपूज्य सदगुरु श्रीसाईबाबा व श्रीअनिरुद्ध बापूंचे गुणसंकिर्तन करणारे आमचे लाडके `आप्पा’ अनिरुद्धसाई चरणी विलीन झाले. त्यांच्या जाण्याने `शब्द’ थांबले… `शब्द’ निःशब्द झाले…  

परमात्म्या आम्हाला हे दु:ख सहन करणे शक्य नाही रे!

||नाथसंविध्||

संपादक- नरेंद्र हडकर

 

You cannot copy content of this page