साठीपार केलेल्या संजय पाटकरची सर्वोत्कृष्ट फलंदाजी!

आमचे बालपणीचे आणि तरुणपणीचे मित्र, क्रिकेट खेळतानाचे सहकारी सन्मानिय संजय पाटकर आजही दर्जेदार व उत्तम क्रिकेट खेळतो. वयाची साठ वर्षे पूर्ण होऊनही आपली क्रिकेट खेळायची हौस आवड त्याने योग्यरितीने जपली. निवृत्तीचे जीवन जगताना नेमकं काय करू असा प्रश्न अनेकांना साठीनंतरचे जीवन जगताना पडतो. मात्र संजय पाटकर ह्या आमचा मित्र आजही मैदानात मोठ्या ताकदीने उत्साहाने खळतो आणि स्पर्धेमध्ये आपल्या संघाला जिंकूनही देतो.

नुकत्याच झालेल्या एमसीएफ बोरिवली पश्चिम, मुंबई आयोजित साठ वर्षावरील पार्थसारथी मेमोरियल ट्रॉफी २०२३ -२४ स्पर्धेत सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून संजय पाटकर याला सन्मानित करण्यात आले. त्याच्या ह्या कामगिरीबद्दल मला, त्याच्या कुटुंबियांना, मित्रमंडळींना त्याचे खूपच कौतुक आहे. त्याचे मनःपूर्वक अभिनंदन! त्याची प्रेरणा आमच्यासाठी आदर्शवत आहे. त्याला खूप खूप शुभेच्छा!

-मोहन सावंत
सहसंपादक- पाक्षिक `स्टार वृत्त’