स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या मंत्रगजराने आणि वचनांनी येणाऱ्या काळात समर्थपणे जगता येईल!

।। हरि ॐ ।।
।। श्रीराम ।।
।। अंबज्ञ ।।
।। नाथसंविध् ।।
।। जय जगदंब जय दुर्गे।।

नववर्षाच्या सर्व श्रद्धावानांना मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

नववर्षाच्या शुभेच्छा ह्या फक्त नववर्षाच्या प्रथम दिवसासाठीच नाहीत! तर नववर्ष २०१९ सालातील प्रत्येक महिना, प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंदासाठी ह्या शुभेच्छा आहेत.

आपण शुभेच्छा देताना `काळाची’ निवड करतो. ह्या काळाला आदि नाही आणि अंत नाही. अशा काळाबरोबर समर्थपणे चालण्यासाठी आपणास सामर्थ्य कुठून प्राप्त होतं? ज्याच्यामध्ये स्वतः काळ राहतो, जो काळाच्या आदिही आहे आणि अंतालाही आहे, जो काळाच्या तीनही प्रकारांना एकाचवेळी हाताळू शकतो, ज्याची काळावर सत्ता असते, अशा आदिमातेच्या पुत्राकडून अर्थात स्वयंभगवान त्रिविक्रम असणाऱ्या परमात्म्याकडून!

भविष्यामध्ये तिसऱ्या महायुद्धाची झळ अधिकाधिक बसणार आहे. त्याचे मानवी जीवनावर भीषण परिणाम होणार आहेत! त्यातून आम्हाला समर्थपणे उभं राहायचं असल्यास `त्याने’ दिलेल्या मार्गावरून चाललं पाहिजे. २०१८ सालामध्ये स्वयंभगवान त्रिविक्रमाचा मंत्रगजर आणि अठरा वचने प्रकटली. त्याच्या सहाय्याने पृथ्वीवरील प्रत्येक मानव खऱ्या अर्थाने सर्वांगिण सुंदर समर्थपणे जीवन जगू शकतो.

रामा रामा आत्माराम त्रिविक्रमा सदगुरुसमर्था।।
सदगुरुसमर्था त्रिविक्रमा आत्माराम रामा रामा।।

ह्या स्वयंभगवान त्रिविक्रमाचा मंत्रगजराने आणि वचनांनी आमच्या जीवनात सुख, शांती, समाधान, यश, कीर्ती, आरोग्य, आनंद, समृद्धी, तृप्ती आणि परमात्म्याचा कृपार्शिवाद कुठल्याही मानवाला मिळू शकतात.

नववर्षात पदार्पण करताना पाक्षिक `स्टार वृत्त’ वेबसाईट https://starvrutta.com/ , ईपेपर https://starvrutta.com/epapergallery/ आणि अॅप्लिकेशनच्या https://play.google.com/store/apps/details?id=com.starvrutta.starvruttanewspaper माध्यमातून भेटीस येणार आहोत! आजपर्यंत सदगुरु कृपेने श्रध्दावानांचा आवडता झालेला `स्टार वृत्त’ आता नव्या रूपातही येत आहे. त्यासाठी श्री. निलेशसिंह कंटक आणि श्री. मनिषसिंह लोके यांनी खूपच मेहनत घेतली आहे. पाक्षिक `स्टार वृत्त’च्या नव्या रूपाचे स्वागत आपल्याकडून होईल, हीच अपेक्षा!

पुन्हा एकदा पुढील काळासाठी मन:पूर्वक हार्दिक अनिरुद्ध शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *