पाळीव प्राण्यांना जवळ घ्या; पण सांभाळून….

पाळीव प्राण्यांचे केस, अश्रु, कोंडा आणि त्यांच्या मूत्रामध्ये आढळणार्‍या घटकांमुळेही आपणास अ‍ॅलर्जी होऊ शकते. त्याशिवाय प्राण्याच्या केसामध्ये अडकलेले परागकण आणि बुरशीचे जीवाणू देखील अ‍ॅलर्जीचे कारण असू शकतात. अशा प्रकारच्या अ‍ॅलर्जीच्या लक्षणांमध्ये
शिंका येणे,
त्वचेवर खाज येणे,
डोळ्यातून पाणी येणे आणि
अस्थमा (दमा)
ही लक्षणे सामील आहेत. पाळीव प्राण्यांच्या सान्निध्यात असणार्‍या लोकांना इतर कोणत्याही गोष्टीची अ‍ॅलर्जी असल्यास पीडित व्यक्तींमध्ये लक्षणांची तीव्रता वाढू शकते. पाळीव प्राण्यांचे केस व त्यातील किडे घातक ठरू शकतात.

आता शहरी भागातही हौस-आवड म्हणून घरामध्ये मांजर, कुत्रा पाळण्याचे प्रमाण वाढले आहे. नैसर्गिकरित्या त्यांचे केस गळत असतात. ते केस अन्नातून गेल्यास अ‍ॅलर्जीचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

You cannot copy content of this page