मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला यश- १६% आरक्षण
मुंबई:- मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं म्हणून मोठा लढा उभारण्यात आला होता. अनेक मोर्चे काढून आणि आंदोलनं करून मराठा समाजाने सरकारकडून अखेर आरक्षण मिळविले आहे. मराठा समाजाला आज शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण मिळालं आहे.
त्यासंदर्भातील विधेयक राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर केले आहे. आता राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर मराठा आरक्षण त्वरित लागू होणार आहे. विशेष प्रवर्ग तयार करून दिलं जाणार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार आहे. अनुदानित वा विनाअनुदानित सर्व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाच्या एकूण जागांपैकी १६ टक्के जागांवर आरक्षण असेल; परंतु अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये ही सुविधा नसेल. राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या लोकसेवांमधील व इतर पदांवरील सरळसेवा प्रवेशाच्या एकूण नियुक्त्यांच्या १६ टक्के आरक्षण प्राप्त होणार होईल.