२०२४ नंतर भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर! -पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवीदिल्ली:- “तिसर्‍या टर्ममध्ये भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक असेल, अशी ग्वाही मी देशाला देईन. म्हणजेच तिसऱ्या टर्ममध्ये भारत पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये अभिमानाने उभा राहील. ही मोदींची हमी आहे. 2024 नंतरच्या तिसऱ्या कार्यकाळात देशाच्या विकासाचा प्रवास अधिक वेगाने होईल, अशी ग्वाही मी देशवासियांना देतो आणि माझ्या तिसर्‍या टर्ममध्ये, तुम्हाला तुमच्या डोळ्यांसमोर तुमची स्वप्ने पूर्ण होताना दिसतील!” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन-कम-कन्व्हेन्शन सेंटर (IECC) संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

त्यावेळी झालेले भाषण ऐकण्यासाठी-पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा!