जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत सहभागासाठी आवाहन

विजेत्यांना मिळणार आकर्षक बक्षिसे : शालेय गटात होणार स्पर्धा

तळेरे (प्रतिनिधी):- २३ जानेवारी जागतिक हस्ताक्षर दिना निमित्त तळेरे येथील “अक्षरोत्सव” परिवार, श्रावणी कंप्युटर्स तळेरे आणि मेधांश कंप्युटर्स कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. शालेय स्तरावरील तीन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही शाळेतील विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. ही स्पर्धा इ. १ ली ते ४ थी, इ. ५ वी ते ८ वी आणि इ. ९ वी ते १२ वी अशा तीन गटात होईल. स्पर्धेत सहभागासाठी ए-फोर साईज झेरॉक्स पेपरच्या एका बाजूला पसायदान लिहायचे असून पाठिमागे स्पर्धकाचे पूर्ण नाव, शाळेचे नाव, इयत्ता, स्पर्धकाचा पत्ता, फोन नंबर इ. माहिती लिहायची आहे.

यासाठी शाईचे पेन, बॉल पेन, जेल पेन वापरण्यास हरकत नाही. मात्र, कट निब अथवा बोरुने लिहिलेले असू नये. आपले स्पर्धेसाठीचे साहित्य 30 जानेवारी पर्यंत प्रज्ञांगण परिवार, महालक्ष्मी प्लाझा, स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या बाजूला, तळेरे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे पाठवावेत. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.

स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी 77198 58387 किंवा 9403 120156 येथे संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा; असे आवाहन आयोजकांनी केले आहे.