आरटीओकडून ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या मागण्या मंजूर, जिल्हावासीयांना दिलासा!

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी):- ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देऊन मुजोर रुग्णवाहिका चालक विशाल जाधव याच्यावर कठोर कारवाई करणे, रुग्णवाहिकेमध्ये शासनाने ठरवून दिलेले दरपत्रक लावणे बंधनकारक करणे, खाजगी वाहनांचे रूपांतर रुग्णवाहिकेमध्ये करण्यास तात्काळ परवानगी देणे आणि वाहन पासिंग करताना सॅनिटायझरची आकारण्यात येणारे शुल्क रद्द करणे; अशा अत्यंत महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. सावंत यांनी सकारात्मक चर्चा करून कोरोना महामारीच्या काळात जिल्हावासियांना दिलासा दिला.

ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने नुकतेच सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देऊन अत्यंत महत्वाच्या खालील मागण्या करण्यात आल्या.

१) मुजोर रुग्णवाहिका चालक विशाल जाधव याच्यावर कठोर कारवाई करून त्याचा रुग्णवाहिका परवाना व वाहन चालक परवाना रद्द करण्यात यावा; जेणेकरून कायद्याचा वचक निर्माण होऊन जिल्ह्यात रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक- मानसिक त्रास होणार नाही.
२) त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णवाहिकेमध्ये शासनाने ठरवून दिलेले दरपत्रक लावणे आणि त्यानुसार रुग्णवाहिकेचे सेवा शुल्क घेणे बंधनकारक करावे.
३) जिल्ह्यामध्ये रुग्णवाहिका कमी असल्यामुळे जे परवानाधारक टेम्पो ट्रॅव्हलर, स्कूल बस आणि प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे रूपांतर रुग्णवाहिकेत करण्याची परवानगी देण्यात यावी.
४) वाहन पासिंग करताना वाहन सॅनिटायझर करण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क रद्द करावे.

यासंदर्भात परिवहन अधिकारी श्री. सावंत यांनी ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या पदाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करून ज्यांना खाजगी चारचाकी वाहनांचे रूपांतर रुग्णवाहिकेमध्ये करायचे आहे; त्यांनी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन केले. कोरोना महामाईच्या काळात जिल्ह्यात रुग्णवाहिका पुरेशा नाहीत त्यामुळे रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप होतो. त्यामुळे रुग्णवाहिकेची संख्या वाढविण्यासाठी ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची मागणी आणि परिवहन अधिकाऱ्यांनी दाखवलेली सकारात्मकता कौतुकास पात्र आहे.

वाहन पासिंगच्यावेळी वाहन सॅनिटायझर करण्यासाठी ५० रुपये फी आकारण्यात येत होती. ती बंद करण्यात आली असून वाहन पासिंगच्या वेळी प्रत्येक वाहन मालकाने स्वतः वाहन सॅनिटायझर करावे; असे संबंधित अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णवाहिकेमध्ये शासनाने ठरवून दिलेले दरपत्रक लावणे आणि त्यानुसार रुग्णवाहिकेचे सेवा शुल्क घेणे बंधनकारक करण्यात येईल; असेही अधिकाऱ्याने आश्वासित केले.

मागण्यांचे निवेदन देतेवेळी ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. संतोष नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा निरिक्षक श्री. मनोज तोरसकर, कणकवली तालुकाध्यक्ष श्री. परेश परूळेकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page