पहिल्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी वि.स.तथा भाऊसाहेब खांडेकर हे करवीरनगरीचे भुषण: सरनाईक

थोर साहित्यिक वि.स.खांडेकर यांच्या ४५व्या स्मृतीदिनी अभिवादन

सिंधुदुर्ग (निकेत पावसकर):- “पहिल्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी वि.स.तथा भाऊसाहेब खांडेकर हे करवीरनगरीचे भुषण असून त्यांनी आपल्या साहित्यातून समता आणि मानवतेचा विचार पेरला!”असे उद्गार लोककलेचे अभ्यासक सुनीलकुमार सरनाईक यांनी काढले.

प्रतिवर्षी सुसंस्कार शिक्षण संस्था व साने गुरुजी सामाजिक संस्थेच्या वतीने थोर साहित्यिक वि.स.खांडेकर यांचा ४५ व्या स्मृतिदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी श्री. सरनाईक बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष भरत लाटकर होते.टाकाळा येथील वि.स.खांडेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी श्री. लाटकर, साथी हसन देसाई यांनी भाऊसाहेबांच्या आठवणी सांगितल्या.

प्रास्ताविक माझी शाळा चे मुख्याध्यापक विजय भोगम व आभार गुलाब अत्तार यांनी केले.यावेळी मेहबूब जमादार, अशोक कांबळे, सुहास खतकर, अरुण आतवाडकर,सुरज गायकवाड आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page