श्रीसिध्दविनायक नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न

सिंधुदुर्ग (जिल्हा प्रतिनिधी):- श्रीसिध्दविनायक नवरात्र उत्सव मंडळ कासार्डेच्यावतीने नवरात्रौउत्सवानिमित्ताने सामाजिक उपक्रम म्हणून आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर शनिवारी संपन्न झाले. दारूम ग्रा. पं. सदस्या सौ. मुग्धा राजेंद्र तळेकर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचा शुभारंभ अभिषेक मंगल कार्यालय कासार्डे येथे करण्यात आला. रक्तदान शिबिरात २७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष सहदेव उर्फ आण्णा खाडये, उपाध्यक्ष अभिजीत शेटये, सहसचिव राकेश मुणगेकर, खजिनदार रूपेश कानसे, दारूम सरपंच सुनिंद्र सावंत, किरण मुणगेकर, राजू शेटये, विनायक जमदाडे, उदय निकम, स्वप्नील राऊत, अतुल सुतार, तात्या पिसे, निखिल पिसे, गुरूप्रसाद पाटील, शैलेश पाटील व जिल्हा रक्तसंक्रमण पतपेढीचे डाॅक्टरर्स व कर्मचारी उपस्थित होते.

गेली १६ वर्षे रक्तदान शिबिराची परंपरा जपत कोरोना काळात सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबवून सिध्दविनायक नवरात्र उत्सव मंडळाने आपली सामाजिक बांधिलकी जपली. यावर्षी केलेल्या रक्तदान शिबिरात २७ रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी महिलांमधून सौ.मुग्धा राजेंद्र तळेकर यांनी रक्तदान केले. शिबीर यशस्वी होण्यासाठी मंडळाचे सभासद व जिल्हा रक्तसंक्रमण पतपेढीचे सहकार्य लाभले.