कॅबिनेट मंत्री जयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यात बदल

मुंबई:- मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील श्री. जयंत पाटील व श्री. छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल केले असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्याला मान्यता दिली आहे.

जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते श्री. जयंत पाटील यांना देण्यात आले असून अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण हे खाते श्री. छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *