राज्यात १ एप्रिलपासून आजपर्यंत १ कोटी ८ लाख ३५ हजार ९२२ शिवभोजन थाळ्या वाटप
मुंबई:- राज्यात दि. १ जुलै ते दि . १९ जुलैपर्यंत ८७० शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे १८ लाख ५६ हजार ३९३ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यातआले असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
राज्यात गरीब व गरजूंना एप्रिल महिन्यात २४ लाख ९९ हजार २५७, मे महिन्यात ३३ लाख ८४ हजार ०४०, जून महिन्यात ३० लाख ९६ हजार २३२, जुलै मध्ये आतापर्यंत १८ लाख ५६ हजार ३९३ असे एकूण दि. १ एप्रिल ते दि . १९ जुलै या कालावधीत १ कोटी ८ लाख ३५ हजार ९२२ शिवभोजन थाळ्या वाटप केल्या आहेत.