परराष्ट्रमंत्र्यांची मंगोलियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची चर्चा!

नवी दिल्ली:- भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मंगोलियाच्या माजी राष्ट्राध्यक्ष एंखंबायर नाम्बर यांची भेट घेऊन दोन्ही देशातील द्विपक्षय संबंध व सहकार्य अधिक दरहूड करण्यावर चर्च केली.

परराष्ट्रमंत्री आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून म्हणाले, आज दुपारीच मंगोलियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची भेट झाली! त्यांच्या दोन्ही देशातील संबंध तसेच आध्यात्मिक संबंध दृढ करण्याच्या योगदानावर प्रभावित झालो.

तत्पूर्वी, शनिवारी नाम्बर यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांची उपराष्ट्रपती सदनात भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी भारत – मंगोलिया संबंधातील पाया असणाऱ्या लोकशाहीचा तसेच स्वातंत्र्याचा आदर्श अधोरेखित करून दोन्ही अध्यात्मिक आणि सांस्कृतिक समबंध अजून दृढ करण्यासाठी बचनबद्ध आहेत; असे उपराष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलने माहिती दिली.

You cannot copy content of this page