सिंधुदुर्गात कोरोनाने ५ जणांचा मृत्यू, तर ३२५ जण कोरोनाने बाधित
सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ७ हजार ०९९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार २५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर आणखी ३२५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण १७/०४/२०२१ (दुपारी १२ वाजेपर्यंत)
आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण:- ३२२+ (३ जिल्ह्याबाहेरील लॅब) = ३२५
सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण:- २,५५१
सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण:- ६
आज अखेर बरे झालेले रुग्ण:- ७,०९९
आज अखेर मृत झालेले रुग्ण:- २१०
आजपर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण:- ९,५६६
टेस्ट रिपोर्ट्स (फेर तपासणीसह)
आर.टी.पी.सी.आर आणि truenat टेस्ट
तपासलेले नमुने आजचे १,०५६, एकूण- ५५,३३५ पैकी पॉजिटीव्ह आलेले- ६,६९०
अॅन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे- ९२, एकूण ३२,५८९ पैकी पॉजिटीव्ह आलेले- २,९५१
पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले-७६ यापैकी ऑक्सिजनवर असणारे -५६, व्हेंटिलेटरवर असणारे-२०
आजचे कोरोना मुक्त- ४६
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या ४८ तासातील रुग्णांचा समावेश आहे . तर आजच्या नवीन पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या २४ तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे . सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.