कातकरी समाजातील व्यक्तींवर अन्याय होऊ देणार नाही! 

वनविभाग कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केलेल्या आदिवासी कातकरी समाजातील व्यक्तींवर अन्याय होऊ देणार नाही!  – जिल्हाध्यक्ष संतोष नाईक

कणकवली:- २५ फेब्रुवारीला ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने फोंडाघाट येथे आदिवासी कातकरी समाजातील वस्तीवर जावून वनविभाग कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केलेल्या व्यक्तींना भेट देऊन वस्तूस्थितीची पाहणी केली व वनविभाग कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केलेल्या आदिवासी कातकरी समाजातील व्यक्तींवर अन्याय होऊ देणार नाही; अशी भूमिका घेण्यात आली. त्यांना ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने जीवनावश्यक वस्तू जिल्हा महिला संघटक सौ. गीतांजली कामत यांच्या सौजन्याने भेट स्वरूपात दिल्या.

कातकरी समाजातील व्यक्तीवर झालेल्या मारहाणीचा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. जर कातकरी समाजाला योग्य न्याय मिळाला नाही तर राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई यांच्याकडे कातकरी समाजाच्यावतीने दाद मागण्यात येईल; असे ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ह्या कातकरी समाजाच्या आदिवासी पाड्यावर पाणी, वीज, रस्ता, पक्की घरे ह्या मुलभूत सुविधाही नाहीत. त्याचाही शासनाने गंभीरपणे विचार करावा; असेही आवाहन संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले.

कातकरी समाज वस्तीवर प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष श्री. संतोष नाईक, जिल्हा निरीक्षक श्री. मनोज तोरसकर साहेब, जिल्हा महिला संघटक सौ. गीतांजली कामत, कणकवली तालुकाध्यक्ष श्री. परेश परूळेकर, उपाध्यक्ष श्री. नारकर सहसचिव सौ.संजना सदडेकर, निरिक्षक श्री. निसार शेख, सदस्य श्री. राजू सावंत, सौ.परूळेकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page