येवा कोकण आपलाच आसा! तेही मुंबईत!!

मुंबई:- असलदे मधलीवाडीतील यशस्वी उद्योजक सन्मा. श्री. दयानंद लोके मुंबई शहरात आजपासून ‘लोके फूड प्रोडक्ट’ नावाच्या शॉपचा शुभारंभ करीत आहेत. येथे कोकणातील सर्व वस्तू व उत्पादने, मालवणी मसाला, लोणचे, कोकम, आगुळ, सरबत, काजू, फणस-आंबा पोळी, नारळ, सर्व प्रकारचे लाडू, मालवणी खाजा अशाप्रकारचे सर्व मालवणी व कोकणी वस्तू चाकरमान्यांना दर्जेदार व किफायतशीर दरात उपलब्ध होणार आहेत.

त्यांना पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा!

गावात यशस्वी उद्योजक असणारे श्री. दयानंद लोके मुंबई शहरातही यशस्वी उद्योजक ठरू दे; अशी सदिच्छा त्यांच्या मित्रमंडळींनी आणि हितचिंतकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *