कुडाळ, वाभवे – वैभववाडी, कसई – दोडामार्ग आणि देवगड – जामसंडे- नगर पंचायत निवडणूक कार्याक्रम जाहीर
सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील कुडाळ, वाभवे – वैभववाडी, कसई – दोडामार्ग आणि देवगड – जामसंडे या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या चार नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत राहणार आहे. या निवडणूक क्षेत्रातील मतदारांवर विपरित प्रभाव टाकणारी कोणतीही कृती/घोषणा कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा इतर पदाधिकाऱ्यांना इतरत्र सुद्धा करता येणार नाही. तरी आचारसंहिता कालावधीत आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
या निवडणुकीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. अंतिम प्रभागनिहायय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिद्ध करण्याचा दिनांक 29 नोव्हेंबर 2021. जिल्हाधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख 30 नोव्हेंबर 2021, नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा कालावधी बुधवार दि. 1 डिसेंबर 2021 सकाळी 11 ते मंगळवार दि. 7 डिसेंबर 2021 दुपारी 2 वाजे पर्यंत. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी बुधवार दि. 1 डिसेंबर 2021 ते मंगळवार दि. 7 डिसेंबर 2021 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. दि. 4 व 5 डिसेंबर 2021 या सुट्टींच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्दी करण्याचा दिनांक बुधवार दि. 8 डिसेंबर 2021, सकाळी 11 वाजल्यापासून. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक (अपिल नसेल तेथे) सोमवार दि.13 डिसेंबर 2021 दुपारी 3 वाजेपर्यंत. अपील असल्यास वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत, जिल्हा न्यायाधिशांकडे अपिल करता येईल. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेत. अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी मात्र दि. 16 डिसेंबर 2021 पर्यंत अपिल असलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र मागे घेता येईल. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिवस, उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक मंगळवार दि. 21 डिसेंबर 2021 सकाळी 7.30 वा. पासून सायंकाळी 5.30 वा. पर्यंत. मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून.